Advertisement

अभिनेत्रींनी मुंबईतच राहून नाचावं, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने दिल्लीतील ‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रींनी मुंबईतच राहून नाच करावा, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते गोपाल भार्गव यांनी केलं आहे.

अभिनेत्रींनी मुंबईतच राहून नाचावं, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान
SHARES

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने दिल्लीतील ‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रींनी मुंबईतच राहून नाच करावा, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते गोपाल भार्गव यांनी केलं आहे.

हेही वाचा- भाजप नेत्याची 'गांधी शांती यात्रा' मुंबईतून सुरू  

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात येत असताना अभिनेत्री दीपिका पदुकोण अचानक तिथं उपस्थित झाली. या ठिकाणी तिने कुठलंही भाषण केलं नसलं, तरी केवळ उपस्थिती दर्शवूनच तिने या आंदोलनाला मूक पाठिंबा दिल्याचं म्हटलं जात आहे. तर छपाक सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिकाने हा स्टंट केल्याचा आरोप भाजप समर्थकांकडून करण्यात आला.

यावर प्रतिक्रिया देताना मध्य प्रदेशातील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव म्हणाले, मला कळत नाही की, अभिनेत्रींनी मुंबईत राहून नाच केला पाहिजे, तिला जेएनयूमध्ये जाण्याची गरजच काय होती? स्वत:ला समाजिक कार्यकर्ते समजणारे डझनभर कलाकार झाले आहेत.

हेही वाचा-शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाल्यावर पेढे वाटू नये- देवेंद्र फडणवीस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा