Advertisement

भाजप नेत्याची ‘गांधी शांती यात्रा’ मुंबईतून सुरू

सुधारीत नागरिकत्व कायदा, एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसोबतच ‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित मुंबई ते दिल्ली ‘गांधी शांती यात्रे’ला गुरूवारी मुंबईतून सुरूवात झाली.

भाजप नेत्याची ‘गांधी शांती यात्रा’ मुंबईतून सुरू
SHARES

सुधारीत नागरिकत्व कायदा, एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसोबतच ‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित मुंबई ते दिल्ली ‘गांधी शांती यात्रे’ला गुरूवारी मुंबईतून सुरूवात झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली आणि ‘राष्ट्रमंच’च्या वतीने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

‘गांधी शांती यात्रे’ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेट वे आॅफ इंडिया इथं झेंडा दाखवला. ही यात्रा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांतून जाणार आहे. तर यात्रेचा समारोप दिल्लीतील राजघाट इथं ३० जानेवारीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला होईल. 

 हेही वाचा- शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाल्यावर पेढे वाटू नये - देवेंद्र फडणवीस

अल्पसंख्याक आणि भटक्या समाजातील नागरिकांमध्ये सुधारित नागरिकत्व कायदा आणि ‘एनआरसी’बाबत भीती आहे. सरकार मागेल ती कागदपत्रे दाखवता आली नाहीत, तर त्यांची रवानगी स्थानबद्धता छावणीत केली जाईल, अशी भीती त्यांना आहे. अशी स्थिती देशात कधीच नव्हती. देशाच्या एकात्मतेला आव्हान देणाऱ्या आणि शांतीपूर्ण मार्गाने प्रश्न मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या घटकांविरोधात एकत्र यावे, त्यांना मार्ग दाखविण्याचे काम गांधींचे विचार करतील, असं पवार यावेळी म्हणाले. 

ही यात्रा सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या हिंसाचाराविरुद्ध काढण्यात येत आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचं संरक्षण करणार आहोत. या देशाचं पुन्हा विभाजन करू देणार नाही. महात्मा गांधींची पुन्हा हत्या होऊ देणार नाही,’ असं वक्तव्य यशवंत सिन्हा यांनी केलं.

यावेळी सिन्हा यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, प्रकाश आंबेडकर, आमदार आशीष देशमुख, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर आदी उपस्थित होते.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा