Advertisement

गुपचूप काही केलं तर वाईटच घडतं, ‘राज’भेटीवरून नवाब मलिक यांचा फडणवीसांना टोला

गुपचूप काही केलं तर त्यातून वाईटचं घडतं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कामगारमंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना लगावला.

गुपचूप काही केलं तर वाईटच घडतं, ‘राज’भेटीवरून नवाब मलिक यांचा फडणवीसांना टोला
SHARES

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली नसल्याचा दावा नुकताच एका कार्यक्रमात केला. त्यावर भाष्य करताना गुपचूप काही केलं तर त्यातून वाईटचं घडतं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कामगारमंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना लगावला.

हेही वाचा- राज ठाकरेंसोबत बैठक, फडणवीसांनी पहिल्यांदाच केलं भाष्य

गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलण्यासोबतच हिंदुत्ववादी विचारधारेच्या मार्गावर वाटचाल सुरू करणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याच विचारधारेच्या आधारे भविष्यात भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात, असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याने या दाव्यांना अधिकच बळ मिळालं.

यासंदर्भात लोकमत सरपंच पुरस्कार सोहळ्यात फडणवीस यांना विचारलं असता, अशा भेटी होतच असतात. परंतु राज ठाकरे आणि आपल्यात अशी कुठलीही बैठक झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु भविष्यात विचारधारा आणि कार्यपद्धती जुळून आल्यास एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो, असंही फडणवीस म्हणाल्याने या दोन्ही पक्षांमध्ये काहीतरी शिजत असल्याचं जाणकारांना वाटू लागलं आहे.

त्यावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया विचारली असता, भलेही फडणवीस या भेटीचा इन्कार करत असले, तरी गुपचूप काही केलं, तर त्यातून वाईटचं घडतं, असं मलिक म्हणाले. 

हेही वाचा- तर, मनसे-भाजप युती शक्य, मुनगंटीवार यांचं वक्तव्य

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा