Advertisement

तर, मनसे-भाजप युती शक्य, मुनगंटीवार यांचं वक्तव्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपची विचारधारा जुळल्यास भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.

तर, मनसे-भाजप युती शक्य, मुनगंटीवार यांचं वक्तव्य
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपची विचारधारा जुळल्यास भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.

मागील २ दशकांहून अधिक काळ भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येऊन महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केल्याने हिंदुत्ववादी विचारधारेशी दगाफटका केल्याचा भाजपकडून शिवसेनेवर आरोप करण्यात येत आहे. हीच पोकळी भरून काढत पक्षाला नव्याने बळ देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी मनसेने हिंदुत्ववादी विचारधारेला आत्मसात करत पक्षाचा झेंडाही भगवा करण्याचं ठरवलं आहे. त्यातच राज ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाल्याने भविष्यात मनसे- भाजप एकत्र येऊ शकतात, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- मनसेच्या महाअधिवेशनात ‘राज’पुत्राचं अधिकृत पदार्पण?

यावर प्रतिक्रिया विचारली असता, मुनगंटीवार म्हणाले, कालपर्यंत शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील, असं म्हटलं तरी लोकांनी वेड्यात काढलं असतं. परंतु हे दोन्ही पक्ष एकत्र आलेच ना. तेव्हा राजकारणात काहीही होऊ शकतं. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली भेट राजकीय नव्हती. तरीही भविष्यात मनसेसोबत भाजपची विचारधारा जुळल्यास हे दोन्ही पक्ष एकत्रही येऊ शकतील. 

तसंच गिरीश महाजन यांनीही मुनगंटीवार यांची री ओढत जर शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, तर समविचारी मनसे-भाजपही भविष्यात एकत्रित येऊ शकतात, असं म्हटलं. ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीत काय चर्चा झाली हे मात्र मला ठाऊक नाही. राजकारणात अशा भेटी होतच असतात, असं महाजन म्हणाले.

 हेही वाचा- CAA विरोधात दीर्घकालीन लढ्याची गरज - प्रकाश आंबेडकर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा