Advertisement

मनसेच्या महाअधिवेशनात ‘राज’पुत्राचं अधिकृत पदार्पण?

मनसे अध्यक्ष ​राज ठाकरे​​​ यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं या अधिवेशनाद्वारे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अधिकृतरित्या पदार्पण होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मनसेच्या महाअधिवेशनात ‘राज’पुत्राचं अधिकृत पदार्पण?
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलंवहिलं महाअधिवेशन दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारीला मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. या महाअधिवेशनाची मनसैनिकांना उत्सुकता लागलेली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं या अधिवेशनाद्वारे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अधिकृतरित्या पदार्पण होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे या उत्सुकतेत आणखीनच भर पडली आहे.  

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये गुप्त बैठक

या अधिवेशनाच्या निमित्ताने राज ठाकरे पक्षासाठी नवीन विचारधारा स्वीकारतील, मनसेच्या झेंड्याचा रंग बदलून केशरी करण्यात येईल, अशा एक ना अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री राज ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

हे महाअधिवेशन मनसैनिकांना सुखद धक्का देणारंही ठरणार आहे. कारण याच अधिवेशनाच्या व्यासपीठावर अमित ठाकरे यांचं राजकारणात पदार्पण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित ठाकरे यांनी मनसेच्या अनेक आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नवी मुंबईत महापालिका कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या मागण्यांविरोधात थाळीनाद मोर्चाचं नेतृत्त्व केलं होतं. तर आरेतील कारशेडच्या मुद्द्यावरुनही अमित ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

हेही वाचा- मनसेच्या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा