Advertisement

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये गुप्त बैठक

आता ही बैठक राजकीय होती की वैयक्तिक हे काही कळू शकलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं भाजपा आणि मनसेनं एकत्र यावं?

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये गुप्त बैठक
SHARES

राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कुठला नेता कोणत्या पक्षाला पाठिंबा देईल किंवा कुठले पक्ष एकत्र येऊन राजकारणात नवीन समीकरण बनवतील हे काही फिक्स नाही. आता हेच बघा ना मनसे आणि भाजपा एकत्र येणाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. आणि याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली बैठक. आता ही बैठक राजकीय होती की वैयक्तिक हे काही कळू शकलेलं नाही. 

दीड तास बैठक

मुंबईत या दोनही नेत्यांमध्ये दीड तास खलबतं झाली असून त्यात नव्या राजकारणाबद्दल चर्चा झाल्याची माहिती पुढे येतेय. त्यामुळे यापुढच्या काळात भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. येत्या २३ तारखेला मुंबईत मनसेचं महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका ठरवणार आहेत. गेली काही वर्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्यानं टीका करत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर त्यांनी जाहीर सभांमधून व्हिडीओ दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती.


भाजपात 'मनसे' एन्ट्री

आता महाराष्ट्रातली परिस्थिती बदलल्यानं राज ठाकरे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेल्यानं मनसेची कोंडी झाली होती. कारण मनसेनं विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ देणारी भूमिका घेतली होती. विधानसभेत सध्या मनसेचा एक आमदार आहे. या बदलत्या राजकारणाचा भाग म्हणून मनसे आपला झेंडाही बदलणार असून हिंदुत्वाची कास धरण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

मनसेच्या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा