Advertisement

राज ठाकरेंसोबत बैठक, फडणवीसांनी पहिल्यांदाच केलं भाष्य

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे.

राज ठाकरेंसोबत बैठक, फडणवीसांनी पहिल्यांदाच केलं भाष्य
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. या बैठकीवरून प्रसारमाध्यमांमध्ये चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.

हेही वाचा- तर, मनसे-भाजप युती शक्य, मुनगंटीवार यांचं वक्तव्य

मनसेचं पहिलंवहिलं महाअधिवेशन दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी येत्या २३ जानेवारी रोजी होत आहे. या अधिवेशनात मनसे हिंदुत्वाची वाट पकडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मनसेच्या झेंड्याचा रंग बदलून केशरी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसं झाल्यास हिंदुत्ववादी विचारधारेच्या आधारे भविष्यात मनसे-भाजप यांच्यात सोयरीक होऊ शकते, असा दावा राजकीय विश्लेषकांकडून होत आहे. त्यातच फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. 

त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात खुलासा केला आहे. राज ठाकरेंसोबत माझी अनेकदा भेट झाली आहे. परंतु आमच्यात आतापर्यंत कुठलीही बैठक झालेली नाही. मनसे आणि भाजपचे विचार तसंच कार्यपद्धतीत कमालीचं अंतर आहे. त्यामुळे सध्या तरी भाजप-मनसे एकत्र येण्याचं चिन्ह नाही. परंतु भविष्यात या कार्यपद्धतीत बदल झाल्यास दोघांच्या युतीबाबत विचार होऊ शकतो, असं म्हणत फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

त्याआधी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार तसंच गिरीश महाजन यांनी दोन्ही पक्षांची विचारधारा जुळल्यास भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात, असं वक्तव्य केलं होतं.

हेही वाचा- मनसेच्या महाअधिवेशनात ‘राज’पुत्राचं अधिकृत पदार्पण?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा