शोमॅन राज कपूर यांचा आयकाॅनिक आर. के. स्टुडिओ विकणार!

शोमॅन राज कपूर यांनी ७० वर्षांपूर्वी बांधलेला आणि चित्रपटसृष्टीच सुवर्णयुग पाहिलेला चेंबूर येथील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांनी घेतला आहे. त्यामुळं कपूर कुटुंबियांची शान म्हणून ओळखला जाणार व त्यांच्यासाठी दुसरं घर असणारा आर. के. स्टुडिओ आता इतिहासजमा होणार आहे.

कुणाचा निर्णय?

राज कपूर यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांच्यासह रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर तीन मुलं व दोन मुली रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकत्रित हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं बॉलिवूडच्या कलाकारांसह अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.

अागीमुळे नुकसान

सन १९४८ साली चेंबूरमधील २ एकर परिसरात आर. के. स्टुडिओ उभारण्यात आला होता. याच आर. के बॅनरतंर्गत ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. १९८८ मध्ये राज कपूर यांचं निधन झाल्यानंतर या स्टुडिओची संपूर्ण जबाबदारी कपूर कुटुंबिय पाहत आहेत.

परंतु गेल्यावर्षी आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर या त्यातील अनेक स्टुडिओ, त्यातील आठवणी जळून भस्मसात झाल्या. त्यामुळ या स्टुडिओची शोभा गेल्यानं आता हा स्टुडिओ विकणं योग्य ठरेल असं ऋषी कपूर यांनी स्पष्ट केलं आहे.

देखभाल खर्च प्रचंड

तसंच स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न कमी असून त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्च जास्त आहे. स्टुडिओला आग लागण्यापूर्वीपासूनच प्रचंड नुकसानाच सामना करावा लागत असल्यानं हा अवाढव्य पांढरा हत्ती सांभाळण्यासाठी अडचणी येत असल्याचं असंही त्यांनी स्पष्ट केलं.

वादविवाद नको

आम्ही सर्व भाऊ एकमेकांच्या खूप जवळ आहोत परंतु आमची मुलं आणि नातवंडेही अशीच असतील असं नाही. आमच्या वडिलांच्या आठवणीमुळं न्यायालयात वाद व्हावे, अस वाटत नसल्याचंही ऋषी कपूर यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा-

लाईट, कॅमेरा, फायर...

आर.के. स्टुडिओची एनओसी रद्द, अग्निशमन दलाकडून कारणे दाखवा नोटीस


पुढील बातमी
इतर बातम्या