Advertisement

आर.के. स्टुडिओची एनओसी रद्द, अग्निशमन दलाकडून कारणे दाखवा नोटीस


आर.के. स्टुडिओची एनओसी रद्द, अग्निशमन दलाकडून कारणे दाखवा नोटीस
SHARES

चेंबूरमधील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला १० दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. या दुघर्टनेप्रकरणी बुधवारी अग्निशमन दलाने स्टुडिओची जुनी एनओसी रद्द केली आहे. तसेच तुमच्यावर गुन्हा दाखल का करण्यात येवू नये? अशाप्रकारची कारणे दाखवा नोटीसही जारी केली आहे.


अग्निशमनच्या सूचना

कपूर कुटुंबीयांच्या मालकीच्या आर. के. स्टुडिओला १६ सप्टेंबर रोजी भीषण आग लागून इमारतीतील दोन स्टेज जळून नष्ट झाले होते. ही घटना घडण्याअगोदर स्टुडिओच्या नूतनीकरणाचे काम करण्यात आले होते. त्यावेळेस स्टुडिओत आगप्रतिबंधक उपाययोजनांची पूर्तता करण्याच्या सूचना अग्निशमन दलाने केल्या होत्या.


जुनी एनओसी रद्द

मात्र या दुघर्टनेनंतर स्टुडिओ व्यवस्थापनाने आगप्रतिबंधक उपाययोजनांची पूर्तता न केल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे या स्टुडिओला अग्निशमन दलाने यापूर्वी दिलेली जुनी एनओसी रद्द केली आहे. ही एनओसी २०१४ मध्ये देण्यात आली होती.


सूचनांकडे दुर्लक्ष

स्टुडिओच्या नूतनीकरणात केबिन तसेच इतर बांधकाम करताना आगप्रतिबंधक उपाययोजनांची पूर्तता करण्यात आली नव्हती. त्यामुळे आग नियंत्रणात आणताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या दुघर्टनेनंतर आर. के. स्टुडिओला अग्निशमन दलाने दिलेले जुने 'ना हरकत प्रमाणपत्र'(एनओसी) करण्यात आले आहे.

- प्रभात रहांगदळे, प्रमुख अधिकारी, मुंबई अग्निशमन दल


तसेच या आगीमुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे असा धोका निर्माण केल्याबद्दल तुमच्याविरोधात गुन्हा दाखल का करण्यात येवू नये, अशा प्रकारची कारणे दाखवा नोटीस महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाययोजना कायदा, २००६ नुसार आर. के. स्टुडिओला पाठवल्याचेही रहांगदळे यांनी सांगितले.



हेही वाचा -

आर. के. स्टुडिओला भीषण आग, २ स्टुडिओ जळून खाक



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा