कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, पण पुन्हा

अभिनेत्री कंगना रणौतचं (Kangana Ranaut) ट्विटर अकाउंट (Twitter Account) काही वेळासाठी सस्पेंड करण्यात आलं होतं. यासंदर्भात कंगनानं ट्विटरवरून माहिती दिली. कंगनानं याबाबत ट्वीट करत तिच्या विरोधकांना अत्यंत कठोर शब्दात इशारा दिला आहे.

तिनं ट्विटरचे सीईओ जॅक यांना टॅग करत चोख उत्तर दिलं आहे, जे तिचं अकाउंट बॅन व्हावं म्हणून मागणी करत होते. तिने असं ट्वीट केलं आहे की, 'लिबरल्स रडत त्यांचे काका 'जॅक' यांच्याकडे पोहोचले आणि माझं अकाउंट अस्थायी रुपात प्रतिबंधित केलं. ते मला धमकावत आहेत. माझं अकाउंट/व्हर्च्यूअल आयडेंटिटी देशासाठी कधीही शहीद होऊ शकते. पण माझं रिलोडेड देशभक्त व्हर्जन चित्रपटातून परत येईल. तुमचं आयुष्य दयनीय करून टाकेन'.

तिचं अकाउंट अस्थायी कालावधीसाठी सस्पेंड होण्यापूर्वी तिनं एक ट्वीट देखील केलं होतं. कंगनानं ट्वीट केलं होतं की, 'देशद्रोही लोकं #SuspendKanganaRanaut हे ट्रेंड करत आहेत, करा. जेव्हा रँग्स (कंगनाची बहिण रंगोली)चं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं तेव्हा मी आले आणि त्यांचं आयुष्य दयनीय करून टाकलं आणि आता त्यांनी माझं अकाउंट सस्पेंड केलं तर मी व्हर्च्यूअल जग सोडेन आणि खऱ्या आयुष्यात दाखवून देईन खरी कंगना रणौत- the mother of all fathers #babbarsherni'

कंगनाच्या या ट्वीटनंतर अनेकांनी तिला पाठिंबा देणारे ट्वीट्स केले आहेत. तर अनेकांनी खरंच तिचं अकाउंट सस्पेंड व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कंगनानं नुकतीच तांडव सिरिजच्या वादात देखील उडी घेतली होती. तिनं तांडवबाबत लिहिताना असं लिहिलं होतं की, 'कारण भगवान श्रीकृष्णानं शिशूपालाच्या ९९ चुका माफ केल्या होत्या... आधी शांती मग क्रांती... यांचा शिरच्छेद करण्याची वेळ आली आहे. जय श्री कृष्ण'.

कंगनाचं हे ट्वीट अनेकांनी रिपोर्ट केलं होतं. हेट स्पीच पसरवणारं, समाजात तेढ निर्माण करणारं, द्वेष निर्माण करणारं हे ट्वीट असल्याचा आरोप कंगनावर केला जात होता. नंतर कंगनाने हे ट्वीट डिलीट केलं होतं.


हेही वाचा

महेश मांजरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल

ईदच्या मुहर्तावर चित्रपट गृहांमध्ये झळकणार 'राधे'

पुढील बातमी
इतर बातम्या