कार्तिक आर्यनने इटलीतून खरेदी केली महागडी कार, तब्बल 'इतकी' आहे किंमत

अभिनेता कार्तिक आर्यन नुकताच कोरोनातून बरा झाला आहे. कोरोनातून बरा होताच कार्तिकने एक महागडी कार खरेदी केली आहे. ही कार त्याने इटलीमधून आणली आहे. ही लॅम्बोर्गिनी कार असून तब्बल साडेचार कोटी रुपये या कारची किंमत आहे.

कार्तिक आर्यनला गाड्यांची प्रचंड आवड आहे. लॅम्बोर्गिनी कार घेणं हे त्याचं स्वप्न होतं. ही कार इटलीहून मुंबईत आणण्यासाठी कार्तिकने ५० लाख रुपये अतिरक्त कर भरला आहे. तीनन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला त्याच्या गाडीची डिलिव्हरी मिळाली आहे. कार्तिककडे स्वतःच्या मालकीची बीएमडब्ल्यूची गाडी आहे, जी त्याने २०१७ मध्ये खरेदी केली होती आणि नुकतीच २०१९ मध्ये कार्तिकने आपल्या आईला मिनी कूपर कार भेट म्हणून दिली आहे.

कार्तिक आर्यन कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्यासह आगामी ‘भूल भुलैया २’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. याशिवाय त्यांचा ‘धमाका’ हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कार्तिक जान्हवी कपूरसोबत करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मध्येही दिसणार आहे.


हेही वाचा -

'हे' १३ सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात

बापरे! अक्षय कुमारनंतर तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण


पुढील बातमी
इतर बातम्या