Advertisement

बापरे! अक्षय कुमारनंतर तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारपाठोपाठ त्याच्या तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.

बापरे! अक्षय कुमारनंतर तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण
SHARES

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारपाठोपाठ त्याच्या तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कलाकार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतू यातील आहेत. त्यामुळे राम सेतू चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. यामुळे या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम सेतू या चित्रपटाची शूटींग मड आयलँडला होत आहे. या शूटींगसाठी ५ एप्रिल रोजी १०० नवीन ज्युनिअर आर्टिस्ट काम सुरु करणार होती. मात्र कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने त्या सर्वांची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यातील ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंड‍िया सिनेइम्प्लॉईजने (FWICE) दिलेल्या माहितीनुसार, राम सेतू या चित्रपटाच्या टीमने पूर्ण खबरदारी घेतली होती. मात्र दुर्देवाने ४५ ज्युनिअर आर्टिस्टला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ४५ ज्युनिअर आर्टिस्टला कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचे शूटींग पुढे ढकलण्यात आलं आहे. जवळपास १३ ते १४ दिवसांनंतर या चित्रपटाचे शूटींग पुन्हा सुरु होणार आहे. दरम्यान अक्षय कुमारला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तो या चित्रपटाच्या सेटवर शूटींग करत होता.

शूटींगदरम्यान कोरोनाची चाचणी बंधनकारक

विशेष म्हणजे या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान बरीच सावधानता बाळगली गेली होती. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान कोरोना चाचणी करणे गरजेचे करण्यात आले होते. यातील अनेकांना शूटींगपूर्वी काही दिवस आयसोलेट केलं जाते. मात्र या दरम्यान त्या कलाकारांचे पैसे कापले जात नाही. तसेच जरी सेटवर कोणाची तब्येत बिघडली तरी त्यांंना अलगीकरणात ठेवले जाते. तसेच अनेकांना या ठिकाणी पीपीई किट देण्यात आले आहेत.



हेही वाचा -

बापरे! अक्षय कुमारनंतर तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण

Maharashtra Weekend Lockdown : काय सुरू काय बंद? जाणून घ्या!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा