#MeToo : अभिनेते अलोक नाथ यांना न्यायालयाचा झटका; याचिका फेटाळली

#MeToo चळवळीत लैंगिक शोषणाचे अनेक अारोप झाल्यानंतर अभिनेते अलोक नाथ यांना अाता न्यायालयाने मोठा झटका दिला अाहे. लेखिका विंता नंदा यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून अलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा अारोप केला होता. यानंतर अलोक नाथ यांची पत्नी अाशू यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत फेसबुकवरील ही पोस्ट काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली अाहे. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

अलोक नाथ यांची याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटलं की, सोशल मिडीयावर पोस्ट टाकणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा एक भाग अाहे. विंता यांना कोणत्याही माध्यमातून बोलण्याचा अधिकार अाहे. टीव्ही, वृत्तपत्रे, सोशल मिडीया किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून त्या अापलं म्हणणं मांडू शकतात.

अारोप चुकीचे 

अलोक नाथ यांनी अापल्यावरील अारोप चुकीचे असल्याचं म्हटलं अाहे. अलोक नाथ यांच्यावर विंता नंदा यांच्याशिवाय अभिनेत्री संध्या मृदुल, हिमानी शिवपुरी, दीपिका आमीन, अमायरा दस्तूर, नवनीत निशान अाणि गायिका सोना महापत्रा  अादींनी लैंगिक शोषणाचे अारोप केले अाहेत. 


हेही वाचा-  

#Metoo: विकास बहल आणखी गोत्यात; लैंगिक अत्याचार केल्याचं महिलेचं प्रतिज्ञापत्र


पुढील बातमी
इतर बातम्या