#metoo : 'संस्कारी बाबूजीं'च्या अडचणीत वाढ

अभिनेत्री तनुश्री दत्तानंतर अनेक महिलांनी पुढे येत आपल्यासोबत घडलेल्या लैंगिक गैरवर्तनाबद्दल आवाज उठवला. #metoo अंतर्गत अनेक महिलांनी त्याच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे. अभिनेता नाना पाटेकर, लेखर चेतन भगत, दिग्दर्शन विकास बहल, गायक कैलाश खेर यांची नावं समोर आली. आता यात आणखी एक नाव समोर आलं आहे ते म्हणजे 'संस्कारी अभिनेता'

#metoo : 'संस्कारी बाबूजीं'च्या अडचणीत वाढ
SHARES

अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #metoo मोहिनेला सुरुवात झाली. बॉलिवूडमधल्या अनेक महिलांनी पुढे येत #metoo    मोहिमेअंतर्गत स्वत:चे अनुभव शेअर केले. बॉलिवूडमध्ये #metoo मोहीम सुरू झाल्यापासून एकापाठोपाठ एक नामांकित व्यक्तींची नावं समोर येत आहेत. या यादीत आता बॉलिवूडच्या संस्कारी अभिनेत्याचं नाव देखील जोडलं गेलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे एका अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. विनता नंदा या १९९० मध्ये गाजलेली मालिका 'तारा'च्या निर्मात्या होत्या


काय म्हणाल्या विनिता नंदा?

विनता नंदा यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे, २० वर्षांपूर्वी बॉलिवूड आणि टीव्हीच्या दुनियेतील सर्वात 'संस्कारी अभिनेत्यानं' माझ्यावर बलात्कार केला. पण संपूर्ण पोस्टमध्ये विनता यांनी त्या अभिनेत्याचं नाव लिहलं नाही. मात्र,आपल्या पोस्टच्या अखेरीस त्यांनी संस्कारी अभिनेता असा उल्लेख केला आहे. बॉलिवूडमध्ये आलोक नाथ यांना संस्कारी बाबुजी म्हणून ओळखलं जातंत्यामुळे त्यांचा रोख अलोक नाथ यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.विनता यांनी लिहलं आहे की, जवळपास २० वर्षापूर्वीची ही घटना आहे. या अभिनेत्याची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड होती. एक दिवस ती शहराबाहेर गेली होती. त्यावेळी त्यानं मला एका पार्टीसाठी घरी आमंत्रित केलं. आमच्यासाठी ही सामान्य बाब होती. आमच्या थिएटर ग्रुपचे सर्व मित्र पार्टीत भेटत असतो. पार्टीमध्ये माझ्या दारुत काहीतरी मिसळण्यात आलं होतं

रात्री जवळपास दोन वाजेच्या सुमारास आम्ही त्याच्या घरातून बाहेर पडलो. त्यावेळी मला विचित्र वाटत होतं. मी माझ्या घराकडे निघाली. मी निघाली तेव्हा रस्त्यावर कुणीच नव्हतं. तेवढ्यात या अभिनेत्याची गाडी येऊन माझ्या बाजूला थांबली. मला घरी सोडण्याची त्या अभिनेत्यानं ऑफर दिली. मी त्याच्या गाडीत बसल्यावर मला बळजबरीनं आणखी दारू पाजण्यात आली होती

दुसऱ्या दिवशी मी उठले त्यावेळी मला खूप त्रास होत होता. माझ्यावर केवळ बलात्कार झाला नव्हता तर माझं शोषण झालं होतं. मला बेडवरून उठता देखील येत नव्हतं. त्यानंतर मी घडलेला सर्व प्रकार माझ्या मित्राला सांगितला. पण त्यांनीही मला ही घटना विसरून जा आणि पुढील आयुष्याचा विचार कर असा सल्ला दिला. पुढे माझी कंपनी बंद झाली. 

पुढे मला प्लस चॅनलवर एक मालिकेचं कथानक आणि दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. मात्र त्या अभिनेत्यानं तिकडेही माझा पिच्छा नाही सोडला. अखेर मला दिग्दर्शक बनायचं नसल्याचं मला मालिकेच्या निर्मात्याला सांगावं लागलं. कारण मला त्या अभिनेत्याच्या आजुबाजूलाही राहायचं नव्हतं. पण मला कामाची आवश्यक्ता होती

मी एका दुसऱ्या मालिकेचं कथानक लिहत होती तेव्हा या अभिनेत्यानं मला पुन्हा घरी बोलावलं. त्यावेळी मला पैसे आणि नोकरी या दोन्हीची गरज होती. मी पराभव मान्य केला. मी विरोध न केल्यामुळे अनेक गोष्टी आणखीन बिघडल्या. त्यानंतर मला दारू आणि अंमली पदार्थांचं व्यसन जडलं. अखेर २००९ नंतर माझ्या मित्र परिवारामुळे माझं जीवन पुन्हा रुळावर यायला सुरुवात झाली

माझ्या आयुष्यातील १० वर्ष धक्कादायक होती. त्यामुळे तुमच्यासोबत अशा घटना घडल्या असतील तर त्यांना उजागर करा. गप्प बसू नका. मला दु:ख फक्त एका गोष्टीचं आहे की, हा व्यक्ती एक चांगला अभिनेता आणि बॉलिवूड, टीव्हीच्या क्षेत्रातील सर्वात संस्कारी व्यक्ती आहे. हेही वाचा

तनुश्री दत्ताची आता महिला आयोगाकडेही धाव

एआयबीला तन्मय भट, गुरसिमरनची सोडचिठ्ठी!


संबंधित विषय