Advertisement

एआयबीला तन्मय भट, गुरसिमरनची सोडचिठ्ठी!


एआयबीला तन्मय भट, गुरसिमरनची सोडचिठ्ठी!
SHARES

'आॅल इंडिया बकचोद' अर्थात एआयबी या युट्यूब चॅनलचा लोकप्रिय चेहरा तसंच एआयबीचा सीईओ तन्मय भट याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोबतच त्याचा साथीदार गुरसिमरन खम्बानेही एआयबीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या गुरसिमरन सक्तीच्या रजेवर गेला आहे. एआयबीच्या एचआरने ट्विटरवर सादर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.


कारण काय?

सोशल मीडियावर सुरू झालेल्या #MeToo मोहिमेनंतर एआयबीला ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे दोघांनीही एआयबीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. एआयबीचे सदस्य उत्सव चक्रवर्ती महिला सहकाऱ्यांना अश्लिल मेसेज पाठवत असल्याचा तसंच त्याचं वर्तन चांगलं नसल्याचा आरोप आॅट्रेलियातील क्रूझ दौऱ्यावर सोबत असलेल्या महिला सहकाऱ्याने केला होता. याबाबतची माहिती तन्मयला देऊनही त्याने उत्सववर कुठलीही कारवाई केली नाही. एवढंच नाही, तर त्यांनी अल्पवयीन मुलींसोबतही गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला.



एआयबीचं स्पष्टीकरण

त्यावर खुलासा करताना एआयबीने आमच्याकडून चूक झाली असून त्याबद्दल माफी मागत असल्याचं सांगितलं. तन्मय कंपनीचा सीईओ असूनही त्याने उत्सववर कुठलीही कारवाई केली नाही. तन्मयचं हे वागणं बेजबाबदारपणाचं असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

जे काही झालं ती आमची चूक आहे. आम्ही याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही. आमचे सदस्य आणि फॉलोअर्स यांच्या वेदना आम्ही समजू शकतो. जे घडलं त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असं एआयबीने म्हटलं आहे.



हेही वाचा-

#Metoo: नाना पाटेकरनंतर कैलाश खेर, विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप

Video: सत्य कायम सत्यच राहणार, तनुश्रीच्या आरोपांवर नानांनी सोडलं मौन



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा