Advertisement

Video: सत्य कायम सत्यच राहणार, तनुश्रीच्या आरोपांवर नानांनी सोडलं मौन

अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर अखेर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सोमवारी दुपारी मौन सोडलं. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नानाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असला, तरी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायचं मात्र त्यांनी टाळलं.

Video: सत्य कायम सत्यच राहणार, तनुश्रीच्या आरोपांवर नानांनी सोडलं मौन
SHARES

'सत्य हे कायम सत्यच राहतं', असं म्हणत बाॅलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर अखेर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सोमवारी दुपारी मौन सोडलं. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नानाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असला, तरी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायचं मात्र त्यांनी टाळलं. एवढंच नव्हे, तर अवघ्या एका मिनिटांत त्यांनी आपली पत्रकार परिषद आटोपली.


काय म्हणाले नाना?

  • तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांवर मी १० वर्षांपूर्वीच माझी बाजू मांडली आहे. त्यामुळे आता नवीन काही सांगण्यासारखं नाही.
  • जे काल सत्य होतं ते आजही सत्य आहे आणि उद्याही हे सत्य कायम राहणार आहे.
  • या विषयावर कुठल्याही प्रसिद्धी माध्यमांशी न बोलण्याचा सल्ला मला माझ्या वकिलांनी दिला आहे.



काय होता तनुश्रीचा आरोप?

आपल्यावर अन्याय झाल्याबाबत जवळजवळ १० वर्षांनी जाग आलेल्या तनुश्रीने नानांवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. २००८ मध्ये दिग्दर्शक राकेश सारंग यांच्या ‘हाॅर्न ओके प्लिज’ या हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान नानांनी खूप त्रास दिला आणि गाण्यात त्यांनी इंटिमेट सीनचाही आग्रह धरल्याचं तनुश्रीचं म्हणणं आहे.


कायदेशीर नोटीस

यावर नानांनी कोणतीही शाब्दिक प्रतिक्रिया न देता वकील राजेंद्र शिरोडकर यांच्या मार्फत तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आणि लवकरच पत्रकार परिषदेतून बाजू मांडणार असल्याचं सांगितलं होतं. तर दुसऱ्या बाजूला तनुश्रीनेही ओशिवरा पोलिस ठाण्यात नाना पाटेकर, राकेश सारंग आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.



हेही वाचा-

वाचाळ बडबड! नाना पाटेकरांची तनुश्रीला नोटीस

#Metoo: नाना पाटेकरनंतर कैलाश खेर, विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा