Advertisement

वाचाळ बडबड! नाना पाटेकरांची तनुश्रीला नोटीस

आपल्यावर अन्याय झाल्याबाबत जवळजवळ १० वर्षांनी जाग आलेल्या तनुश्रीने नानांवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. २००८ मध्ये दिग्दर्शक राकेश सारंग यांच्या ‘हाॅर्न ओके प्लिज’ या हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान नानांनी खूप त्रास दिला आणि गाण्यात त्यांनी इंटिमेट सीनचाही आग्रह धरल्याचं तनुश्रीचं म्हणणं आहे.

वाचाळ बडबड! नाना पाटेकरांची तनुश्रीला नोटीस
SHARES

अभिनेते नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वाद आता न्यायालयाच्या पायरीपर्यंत पोहोचला आहे. तनुश्रीने केलेल्या आरोपांना कायद्याच्या भाषेत प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेत नानांनी तिला नोटीस बजावली आहे.


१० वर्षांनी जाग

आपल्यावर अन्याय झाल्याबाबत जवळजवळ १० वर्षांनी जाग आलेल्या तनुश्रीने नानांवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. २००८ मध्ये दिग्दर्शक राकेश सारंग यांच्या ‘हाॅर्न ओके प्लिज’ या हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान नानांनी खूप त्रास दिला आणि गाण्यात त्यांनी इंटिमेट सीनचाही आग्रह धरल्याचं तनुश्रीचं म्हणणं आहे. यावर नानांनी कोणतीही शाब्दिक प्रतिक्रिया न देता वकील राजेंद्र शिरोडकर यांच्या मार्फत तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.


आरोपांमागे आरोप

नानांमागोमाग तनुश्रीने एका मागोमाग एक बऱ्याच कलाकार-तंत्रज्ञांवर आणि आता राजकारण्यांवरही आरोप केले आहेत. ‘हाॅर्न ओके प्लिज’मधील गाण्याची कोरिओग्राफी करणाऱ्या गणेश आचार्य यांच्यासह अमिताभ बच्चन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही तनुश्रीने आरोप केले आहेत. नानांनी पाठवलेल्या या नोटीसीला तनुश्री कशाप्रकारे उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा