बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं आपल्या आगामी चित्रपटात व्हिलन साकारणाऱ्या सुदीपचा फर्स्ट लूक शेयर केलाय. विजयादशमीचं औचित्य साधून प्रदर्शित केलेल्या दबंग ३ चित्रपटातल्या 'रावणाची'' पहिली झलक आज सगळ्यांना पाहायला मिळाली. दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप दबंग ३ मध्ये 'बल्ली'ची भूमिका करणार आहे. सलमान खाननं ट्वीटरवर फर्स्ट लूक शेअर केला आहे.
'व्हिलन जितका मोठा, तितकी त्याच्याशी लढताना धमाल येते', असं कॅप्शनही सलमाननं या फोटोसोबत लिहिलं आहे. याआधी सलमानचा फर्स्ट लूक आला होता. त्यामध्ये सलमानचा चुलबुल अंदाज सगळ्यांनीच पाहिला. सलमानच्या त्या फर्स्ट पोस्टप्रमाणे सुदीपचा हा लूक काही वेळातच व्हायरल झाला.
'दबंग ३' हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. दबंगच्या या भागाचं दिग्दर्शन प्रभू देवानं केलं आहे. याआधी प्रभू देवानं सलमानसोबत 'वॉन्टेड' हा चित्रपट केला होता.
हेही वाचा