Advertisement

यामुळं सोनालीचं ‘जगनं झालं न्यारं…’

नेहमीच विविधांगी भूमिकांद्वारे रसिकांना आश्चर्यचकीत करणारी ‘नटरंग’ फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता ‘हिरकणी’च्या रूपात प्रगटणार आहे. ‘हिरकणी’ या आगामी सिनेमातील तिचं ‘जगनं हे न्यारं झालं जी...’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

यामुळं सोनालीचं ‘जगनं झालं न्यारं…’
SHARES

नेहमीच विविधांगी भूमिकांद्वारे रसिकांना आश्चर्यचकीत करणारी ‘नटरंग’ फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता ‘हिरकणी’च्या रूपात प्रगटणार आहे. ‘हिरकणी’ या आगामी सिनेमातील तिचं ‘जगनं हे न्यारं झालं जी...’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

सोनालीनं स्वत: ‘मुंबई लाइव्ह’सोबत ‘जगनं हे न्यारं झालं जी...‘ हे गाणं शेअर केलं आहे. या सिनेमात सोनालीनं शिवकालीन इतिहासातील सुवर्णाक्षरांमध्ये नोंद झालेल्या एका झुंझार मातेची भूमिका साकारली आहे. ‘जगनं हे न्यारं झालं जी...’ या गाण्यात बाळंतपणापूर्वीची हिरकणी पहायला मिळते. याखेरीज अभिनेता अमित खेडेकरसोबतची सोनाली केमिस्ट्रीही या गाण्याची खासियत असल्याचं म्हणायला हरकत नाही. गड-किल्ल्यांवर शूट करण्यात आलेलं हे गाणं कॅमेरावर्क आणि इतर तांत्रिक बाबींमुळंही स्मरणात राहतं.

महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येकानं कधी ना कधी, कोण ना कोणाकडून तरी हिरकणीची कथा ऐकली असेलच. या धाडसी मातेचीच कथा प्रेक्षकांना आता रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘कच्चा लिंबू’ या सिनेमाच्या दिग्दर्शन शैलीमुळं सिनेरसिकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांचच लक्ष वेधून घेणाऱ्या प्रसाद ओकनं ‘हिरकणी’चं दिग्दर्शन केलं आहे. प्रत्येक आई असतेच हिरकणी असं टायटल देत प्रसादनं केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील मातांनाच जणू हा सिनेमा अर्पण केला आहे. माय माऊली हिरकणीची आपल्या बाळासाठी असलेली ओढ आणि केवळ आपल्या बाळासाठी गडाची कडा उतरण्याची जोखीम उचलणाऱ्या ‘हिरकणी’ची झलक प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.

चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’ या सिनेमात सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर आपल्या तान्ह्या बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या माऊलीची कथा पहायला मिळणार आहे. या सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे. राजेश मापुस्कर हे या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


https://m.youtube.com/watch?v=ymUqnQvdbL4



हेही वाचा -

तेजस्विनीमागोमाग कश्मिराची नवरात्र रूपं पाहिली का?

स्वराज्यातील स्त्रीशक्ती शत्रूला देणार 'फत्तेशिकस्त'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा