'या' कारणामुळे सलमान दोषी आढळला

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • बॉलिवूड

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने तब्बल २० वर्षानंतर गुरुवारी अभिनेता सलमान खानला दोषी ठरवलं आहे. मात्र या प्रकरणातील सहआरोपी सैफ अली खान, तब्बू, निलम आणि सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

सलमान खान आणि त्याचे साथीदार म्हणजेच  सैफ अली खान, तब्बू, निलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर ५ काळवीटांची (ब्लॅक बक) शिकार केल्याचा आरोप होता. याशिवाय सलमानवर आर्म्स अॅक्टनुसारही गुन्हा दाखल झाला होता.

म्हणून सलमान दोषी 

1998 मध्ये जोधपूरमध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शुटिंगनंतर सलमान खान आणि इतर चौघे कलाकार घोडा फार्म हाऊस येथे थांबले होते. त्यावेळी त्यांनी भवाद गावात २७-२८ सप्टेंबरच्या रात्री काळवीटांची शिकार केली होती. 

यानंतर कांकणी गावात २ ऑक्टोबर रोजी जिप्सी कारमध्ये बसून काळवीटांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यावेळी गोळ्यांचा आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी आले.  तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला होता. 

त्यावेळी दोन हरणांचे मृतदेह तिथेच पडून असल्याचे पाहिल्यानंतर बिष्णोई समाजातील एकाने सलमानचा पाठलाग केला आणि नंतर प्रत्यक्षदर्षींनी सलमानसह इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ज्यात सलमान दोषी आढळला.   


हेही वाचा - 

काळवीट शिकारप्रकरणी सलमान एकटाच दोषी, सहआरोपींची निर्दोष सुटका

पुढील बातमी
इतर बातम्या