Advertisement

काळवीट शिकारप्रकरणी सलमान एकटाच दोषी, सहआरोपींची निर्दोष सुटका


काळवीट शिकारप्रकरणी सलमान एकटाच दोषी, सहआरोपींची निर्दोष सुटका
SHARES

राजस्थानमध्ये १९९८ मध्ये 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान झालेल्या काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवलं, तर इतर ४ सहआरोपींची निर्दोष सुटका केली आहे. तब्बल २० वर्षानंतर गुरुवारी या खटल्याचा निकाल लागला आहे.


'या' चौघांची निर्दोष सुटका

जोधपूरजवळच्या कांकणी गावाजवळ दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यासह अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम हे सहआरोपी होते. या खटल्यातील अंतिम युक्तिवाद २८ मार्चला पूर्ण झालं. त्यानंतर सलमान खान बुधवारी खासगी विमानाने मुंबई विमानतळाहून जोधपूरला निघाला. जोधपूर न्यायालयाने या खटल्याचा अंतिम निकाल गुरुवारी सुनावला. यामध्ये अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांची निर्दोष सुटका झाली आहे.


संपूर्ण प्रकार

२० वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी सलमानसह इतर कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. दरम्यान १ आणि २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री हे सर्वजण एका जिप्सी कारमध्ये होते. ती कार सलमान चालवत होता. त्यावेळी काळवीटांचा एक कळप दिसताच सलमाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांचा मृत्यू झाला. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटांची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात किमान १ वर्ष आणि जास्तीत जास्त सहा वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा