२५ वर्षीय अनमोल अंबानींनी वाढवला रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांचा उत्साह

आर्थिक सेवा बाजारपेठेत तंत्रज्ञानाचा उत्तोमत्तोम वापर करून पहिल्या क्रमांकावर येण्याचे लक्ष्य कंपनीने बाळगल्याचे प्रतिपादन रिलायन्स कॅपिटलचे कार्यकारी संचालक आणि प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांचे चिरंजीव अनमोल अंबानी यांनी मुंबईत केले. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) पहिल्यांदाच भाषण करताना त्यांनी कंपनीचे ध्येय-धोरण आणि पुढील वाटचाल कर्मचाऱ्यांपुढे अधिक स्पष्टपणे मांडली.

''देशाचे आर्थिक भविष्य साकारण्याची संधी आपल्याला भेटस्वरूपात मिळालेली आहे. आपल्या प्रत्येकात ती क्षमता, महत्वकांक्षा आहे. आपण डिजिटल माध्यमातून जोडले गेलोय, आपण स्वप्नाळू आहोत, त्यामुळे आपण ठरवलेले ध्येय नक्कीच पूर्ण करू'', असे म्हणत २५ वर्षीय अनमोल यांनी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.

टाॅप ३ मध्ये येण्याचे लक्ष्य

रिलायन्स कॅपिटल सध्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (एनबीएफसी) श्रेणीत निव्वळ मूल्याच्या (नेटवर्थ) आधारे पहिल्या क्रमांकावर आहे. पण अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप (एडीएजी)मधील सर्व उपकंपन्या प्रत्येक श्रेणीतील व्यवसायात टाॅप ३ मध्ये येतील यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असेही अनमोल यांनी सांगितले.

येथे मिळवली डिग्री

अनमोलने वाॅरविक बिझनेस स्कूल, यूके मधून डिग्री मिळवली असून गेल्या दोन वर्षांपासून ते फायनांन्शियल बिझनेसमध्ये सक्रीय आहेत.

पुढील वर्षापासून इन्शुरन्स सेवा

अनमोल यांनी सध्या 'फिनटेक' इंडस्ट्रीतील संधीकडे लक्ष केंद्रीत केले असून आर्थिक वर्षाच्या अखेरीस इन्शुरन्स बिझनेसमध्ये पाय रोवण्याची तयारीही केली आहे. कंपनीला इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथाॅरिटी (इर्डा) कडून प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. ही सेवा पुढील वर्षापर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.


हेही वाचा -

'सीसीडी'वर प्राप्तिकर विभागाचे छापे


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या