५ वर्षात बँकांच्या 'इतक्या' शाखा झाल्या बंद

देशात मागील ५ वर्षात २६ सरकारी बँकांच्या तब्बल ३४०० शाखा कमी झाल्या आहेत. यामधील काही शाखा बंद करण्यात आल्या आहेत. तर काही शाखांचं विलीनीकरण करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या खुलाशातून ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे बंद झालेल्या किंवा विलीनीकरण झालेल्या या शाखांमधील ७५ टक्के शाखा ह्या देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या आहेत. 

माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी रिझर्व्ह बँकेकडे माहिती मागवली होती. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ९० शाखा, २०१५-१६ मध्ये १२६ शाखा, २०१६-१७ मध्ये २५३ शाखा, २०१७ -१८ मध्ये २०८३ आणि २०१८-१९ मध्ये ८७५ शाखा बंद किंवा त्यांचं विलीनीकरण झालं आहे. 

मागील ५ वर्षात एसबीआयच्या सर्वाधिक शाखा कमी झाल्या आहेत. एसबीआयच्या एकूण २५६८ शाखा बंद किंवा त्यांचं विलीनीकरण झालं आहे. १ एप्रिल २०१७ ला भारतीय महिला बँक, स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपुर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या बँकांचं एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आलं. त्यामुळे एसबीआयच्या एवढ्या शाखा कमी झाल्या. 


हेही वाचा -

बेरोजगारांसाठी खूशखबर, पोस्टात 'एवढ्या' पदांसाठी भरती

COUPLES साठी पैशांचं व्यवस्थापन करणारी अॅप्स


पुढील बातमी
इतर बातम्या