Advertisement

बेरोजगारांसाठी खूशखबर, पोस्टात 'एवढ्या' पदांसाठी भरती

पोस्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर एक नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

बेरोजगारांसाठी खूशखबर, पोस्टात 'एवढ्या' पदांसाठी भरती
SHARES

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर आहे. पोस्टात तब्बल ३६५० जागांसाठी भरती होणार आहे. नवी मुंबई, सोलापूर, पुणे, अहमदनगर, ठाणे या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी शिक्षणाची अट फक्त १० वी पास असणार आहे. 

ब्रँच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर, आणि ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ही मोठी भरती होणार आहे. पोस्टाच्या www.indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर एक नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे.  अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे. उमेदवार किमान १० वी पास असणं बंधनकारक आहे. उमेदवाराला कम्प्युटरचं आणि मराठीचं ज्ञान आवश्यक आहे.

भरतीसाठी अर्जदाराचं वय किमान १८ वर्षे आणि अधिकाधिक ४० वर्षांच्या दरम्यान असावं.  तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्ष  अट शिथिल केली आहे.  मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठीही ३ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल आहे. सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी १०० रुपये असेल.  एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क द्यावे लागणार नाही. 



हेही वाचा -

COUPLES साठी पैशांचं व्यवस्थापन करणारी अॅप्स




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा