कंपन्या विकून अनिल अंबानी कर्ज फेडणार

कर्जाचा डोंगर असलेल्या अनिल अंबानी यांनी आता आपल्या आणखी २ कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या या २ कंपन्या विकून अनिल अंबानी कर्जाची रक्कम फेडणार आहेत. सध्या अंबानी आपल्या या २ कंपन्यांसाठी गुंतवणुकदारांच्या शोधात असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी २ कंपन्या संकटात

अनिल अंबानी यांच्या यांच्या आणखी २ कंपन्या संकटात सापडल्या आहेत. यामध्ये रिलायन्स कॅपिटलमधील रिलायन्स होम फायनांन्स आणि रिलायन्स कमर्शिअल फायनांन्स लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे, या दोन्ही कंपन्यांचं रेटींग प्रमाणापेक्षा अधिक कमी झाल्यानं अंबानी यांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या रिलायन्स कॅपिटल दोन्ही कंपन्यांसाठी गुंतवणुकदाराच्या शोधात असल्याची माहिती समोर आली आहे. 

क्रेडिट रेटींगमध्ये सुधारणा

सध्या कंपनी प्रशासन देशातील तसंच परदेशातील गुंतवणुकदारांशी चर्चा करत आहे. तसंच येत्या २ ते ३ महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार असून भविष्यकाळात कंपनीची वाढ होण्यासाठी नव्या गुंतवणुकदारांची मदत होणार असल्याची माहिती रिलायन्स कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित बाफना यांनी दिली. तसंच कंपनीच्या क्रेडिट रेटिंगमध्येही सुधारणा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या या दोन्ही कंपन्यांवर १७ हजार कोटी आणि १६ हजार कोटी रूपयांचं कर्ज आहे.


हेही वाचा -

भाजप नगरसेवकाचा मनसेच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला


पुढील बातमी
इतर बातम्या