भाजप नगरसेवकाचा मनसेच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी ८ ते १० गुंडांसोबत मध्यरात्री १२ वाजता प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भाजप नगरसेवकाचा मनसेच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडल्यावर पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवकाने मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केला. विजय चिपळेकर असं भाजप नगरसेवकाच नाव आहे. या हल्ल्यात मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव जखमी झाले. 


घटना सीसीटीव्हीत कैद

भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी ८ ते १० गुंडांसोबत मध्यरात्री १२ वाजता प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हल्ला केल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांच्या गुंड साथीदारांनी तेथून पळ काढला.


९ जणांवर गुन्हा

पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. हे पैसे मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी कामोठे पोलिस स्टेशनमध्ये भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



हेही वाचा -

तब्बल १६०० स्थलांतरीत प्रकस्पग्रस्त मतदानापासून वंचित

आफताब शिवदासानी दिसणार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा