Advertisement

आफताब शिवदासानी दिसणार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत


आफताब शिवदासानी दिसणार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत
SHARES

एका मोठ्या ब्रेकनंतर अभिनेता आफताब शिवदासानी महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आगामी चित्रपटात आफताब शिवदासानी आयपीएस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. अश्विनी चौधरी दिग्दर्शित ‘सेटर्स’ या चित्रपटात आफताब झळकणार आहे.


आफताब शिवदासानीनं य भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. पोलिसांचे दैनंदिन जीवन आणि काम करण्याची पद्धत, त्यांना पेलावी लागणारी आव्हानं, जबाबदारी यांचा सखोल अभ्यास आफताबनं केला आहे.

आफताबनं ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. चित्रपटात तो पोलीस अधिकारी आदित्य सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. हा फोटो शेअर करत त्यानं लिहिलं आहे की, एकटेपणात एक शक्ती आहे. या शक्तीला फार कमी लोकं ओळखू शकतात.


‘सेटर्स’ चित्रपटातील कथा शिक्षण जगतातील माफियांवर आधारीत आहे. यात आफताब माफियांविरोधात लढताना दिसणार आहे. हा चित्रपट ३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आफताबसोबत श्रेयस तळपदे देखील पाहायला मिळणार आहे. श्रेयस चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसेल.

लव्हली फिल्म्स प्रोडक्शन आणि एनएच स्टुडिओज निर्मित सेटर्स चित्रपटात आफताब शिवदासानी, श्रेयस तळपदे, सोनाली सेहगल, इशिता दत्ता, पवन मल्होत्रा, विजय राज, जमील खान, मनू रिशी, पंकज झा, नीरज सूद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा