लॉकडाऊन वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला 17.58 लाख कोटींचा फटका

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लाॅकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. दुसऱ्यांदा लाॅकडाऊन वाढल्याने याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे.  लॉकडाऊन वाढवल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 17.58 लाख कोटी रुपयांचं नुकसान होईल, असा अंदाज ब्रिटिश ब्रोकरेज कंपनी बार्कलेजने वर्तवला आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये जीडीपीची वाढ शून्य राहील, असं शंकाही अशी शंका बार्कलेजने व्यक्त केली आहे. 

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. संपूर्ण देश ठप्प झाल्याने अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होणार आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीडीपी वाढ 0.8 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर बार्कलेजच्या म्हणण्यानुसार, भारताचा जीडीपी शून्य राहील. 

3 आठवड्याच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे 120 अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल, असं बार्कलेजने आपल्या आधीच्या अंदाजात सांगितलं होतं. आता लॉकडाऊन वाढवल्यामुळे हा आकडा 234.4 अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता बार्कलेजने वर्तवली आहे. आधीच्या अंदाजात बार्कलेजने सांगितलं होतं की, 2020 मध्ये भारतात जीडीपी वृद्धीची गती 2.4 टक्के असेल. मात्र आता त्यांनी ही गती शून्य राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवणे गरजेचे असले तरीही या काळात भारतीय अर्थव्यवस्थेचे खूप मोठे नुकसान होणार आहे.


हेही वाचा -

दादरमध्ये आणखी २ जण कोरोनाग्रस्त

कोरोनाचे धारावीत ५ नवे रुग्ण


पुढील बातमी
इतर बातम्या