Advertisement

कोरोनाचे धारावीत ५ नवे रुग्ण

धारावीत ५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं धारावीतील रुग्णांची संख्या ६० वर गेली आहे. धारावीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे धारावीत ५ नवे रुग्ण
SHARES

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईतील धारावी आणि दादरमध्ये बुधवारी ८ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. दादरमध्ये २ व माहिममध्ये १ रुग्ण आढळला असून, धारावीत ५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं धारावीतील रुग्णांची संख्या ६० वर गेली आहे. धारावीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावीत सापडलेल्या ५ नव्या रुग्णांपैकी २ महिला आहेत. तर सर्व रुग्ण २४ ते ४७ वयोगटातील असून ५ ही जण धारावीच्या मुकुंदनगरमध्ये राहणारे रहिवासी आहेत. धारावीत आतापर्यंत मुकुंद नगरमध्ये १४, मुस्लिम नगर आणि जनता सोसायटीत प्रत्येकी ७, सोशल नगरमध्ये ६, बलिगा नगरमध्ये ५, शास्त्री नगर आणि कल्याणवाडीत प्रत्येकी ४, वैभव अपार्टमेंट्स, मुरुगन चाळ, राजीव गांधी चाळ आणि मदिना चाळमध्ये प्रत्येकी २ आणि धनवाडा चाळ, पीएमजीपी कॉलनी, नेहरु चाळ, इंदिरा चाळ आणि गुलमोहर चाळमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडलेला आहे. तर मुस्लिम नगर, सोशल नगर, नेहरु चाळमध्ये प्रत्येकी एक तर बलिगा नगर आणि कल्याणवाडीत प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

दादरमध्ये २ नवे रुग्ण सापडल्यानं दादरमधील रुग्णांची संख्या २१ वर गेली आहे. तसंच, माहीममधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७वर गेली आहे. दादरमध्ये एका ७५ वर्षीय महिलेला आणि ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. हे दोघेही शिवाजी पार्क परिसरात राहतात. 

दादरमध्ये आतापर्यंत सुश्रुषा रुग्णालयात दोन डॉक्टर आणि ६ नर्ससह ८जणांना, तावडेवाडीत २१, केळकर रोड आणि शिवाजी पार्क येथे प्रत्येकी दोन आणि दिनकर अपार्टमेंट, सौभाग्य अपार्टमेंट, कासारवाडी, आणि आंबेडकर नगरमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली आहे. तर माहीमच्या प्रकाश नगरमध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा