सुट्ट्या पैशांसाठी दलालांकडून नागरिकांची लूट

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

मुंबई - सुट्ट्या पैशांसाठी मुंबईत दलालांनी सर्वसामान्यांची लूट केली जात असल्याचा आरोप केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर 500 आणि 1000 च्या नोटा रद्द झाल्यामुळं सुट्ट्या पैशांसाठी वणवण सुरु आहे. याच परिस्थितीचा काही दलालांनी आणि दुकानदारांनी गैरफायदा घेतला आहे. 500 रुपयांची नोट सुट्टी करून देण्यासाठी 100 रुपये कमिशन उकळलं जातं आहे, तर काही ठिकाणी 500 रुपयांच्या बदल्यात 450 रुपयेही दिले जात आहेत. सुट्ट्या पैशांचा तुटवडा असल्यानं गरजू नागरिकांची लूट या दलालांकडून होत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या