कोरोनाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसांचा लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मागील महिन्यात २४ मार्चला लाॅकडाऊन लागू झाला आहे. त्यामुळे पूर्ण देश ठप्प झाला आहे. लाॅकडाऊनचे परिणाम सर्वच क्षेत्रांवर मोठे दिसून आले आहेत. इंधन वापरावरही लाॅकडाऊनचा मोठा परिणाम झाल्याचं समोर येत आहे. लॉकडाऊनमुळे इंधन वापरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
देशाच्या एकूण इंधन वापरामध्ये मार्च महिन्यात १८ टक्क्यांची घट आली आहे. मागील 10 वर्षातील ही सर्वात मोठी घट आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. त्याचा परिणाम इंधन वापर घटण्यावर झाला आहे. याबाबतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पेट्रोलियम पदार्थांच्या वापरामध्ये मार्च महिन्यात १७.७९ टक्के घट झाली. गेल्या महिन्यात संपूर्ण देशभरात 1 कोटी ६८ लाख टन इंधन वापरले गेले.
डिझेलच्या वापरामध्येही मार्च महिन्यात मोठी घट झाली आहे. देशात डिझेलची मागणी २४.२३ टक्क्याने घटून ५६ लाख टनापर्यंत खाली आली आहे. डिझेलची मागणी आणि वापरामधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी घट आहे. लॉकडाऊनमुळे महामार्गावरील ट्रक, कंटेनरची वाहतूकही मोठ्या प्रमाणात घटली. त्याचा परिणाम डिझेलच्या मागणीवर झाला आहे.
हेही वाचा -
Coronavirus Updates: दक्षिण मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या २५० वर
राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप