व्हॉट्सअपच्या मदतीनं जिओमार्ट सुरु, घरबसल्या किराणा सामानाची आॅर्डर

फेसबुकनं नुकतीच रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे आता दोघांच्या भागीदारीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. फेसबुकचे व्हॉट्सअपच आणि जिओच्या मदतीनेेेे जिओमार्टची सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओमार्ट हा एक इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. यामार्फत तुम्हाला किराणा घरबसल्या आॅर्डर करता येणार आहे.  

सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात जिओमार्टची सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओमार्टची सेवा घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांना 8850008000  हा व्हॉट्सअप (WhatsApp)  क्रमांक आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सअपवरुन या क्रमांकाला Hi पाठवल्यास एक लिंक येईल. ही लिंक ३० मिनिटांसाठी वैध असते. त्यापेक्षा अधिक वेळ लागल्यास पुन्हा मेसेज पाठवावा लागतो.

लिंक उघडून तुम्ही तुमच्या मालाची ऑर्डर केल्यानंतर कंपनी तुमची ऑर्डर एका किराणा दुकानासोबत शेअर करेल. यानंतर ग्राहकांना ऑर्डरबाबत नोटिफिकेशन आणि दुकानाबाबतची सर्व माहिती मिळते. ग्राहकांची आॅर्डर तयार झाल्यावर त्यांना एसएमएस पाठवला जाईल. सध्या होम डिलीव्हरीचा सुविधा दिलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना ऑर्डर दिल्यानंतर संबंधीत किराणा दुकाना किंवा जिओ मार्ट स्टोरमध्ये जाऊन किराणा आणावा लागेल. 


हेही वाचा -

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा खास आराखडा

Coronavirus Update: धारावीत ३४ नवे कोरोनाग्रस्त, एकूण संख्या २७५ वर

Coronavirus Updates: मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, सरकारी नोकरी


पुढील बातमी
इतर बातम्या