नोटा बदलण्यासाठी सरकारी कार्यालयांबाहेर रांग

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

परळ - जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी परळ-शिवडी परिसरातील सरकारी कचेऱ्यांबाहेर गुरूवारी सर्वसामान्य नागरिकांची एकच गर्दी उसळली. नोटाबंदी निर्णय लागू झाल्यानंतर जुन्या नोटा वापरासाठी सरकारने काही महत्वाची ठिकाणं दिली होती. ज्यामध्ये रुग्णालये, पेट्रोल पंप, औषध दुकानं, रेल्वे स्थानक, वीज भरणा केंद्र, पालिका कचेऱ्या इत्यादी ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले होते. मात्र जुन्या नोटांच्या वापरासाठी देण्यात आलेली मुदत गुरूवारी संपत असल्यानं शेकडो नागरिकांनी कामाच्या सुट्ट्या काढून रांगेत उभे राहत नोटा बदली करून घेतल्या. दरम्यान सरकारचं हे काळ्यापैश्यांच सर्जिकल स्ट्राईक सर्वसामान्यांना महाग पडल्याची प्रतिक्रिया कल्पना भवर यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या