Home Insurance घेणं का आवश्यक? 'हे' आहे कारण

नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी गृह विमा घेणं अत्यंत आवश्यक आहे. पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे कधीही होऊ शकतं आणि कोणाच्या बाबतीतही हे घडू शकतं. गेल्या १० वर्षांपासून भारतात नैसर्गिक आपत्तीची घटना वेगाने वाढत आहे. यामधून होणाऱ्या नुकसानीची रक्कम कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत वास्तविक नुकसान किती झाले हे सांगणे कठीण आहे. परंतु ज्यांना त्यांच्या आर्थिक गरजा समजल्या आहेत आणि योग्य विमा निवडला आहे, त्यांच्या नुकसानीची भरपाई मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणूनच, गृह विमा घेणं का महत्त्वाचं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. बहुतेक विमा कंपन्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घरांचा विमा पॉलिसी देतात.

गृह विमा

गृह विम्याचे दोन प्रकार आहेत. अग्नि विमापॉलिसी आणि सर्वसमावेशक विमा पॉलिसी

अग्नि विमा पॉलिसी

  • - अग्नि विमा पॉलिसीत घराचे पूर, वादळ, शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेली आग यामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश होतो. - काही विमा कंपन्याचा विमा हफ्ता जास्त असतो. याचं कारण म्हणजे भूकंप आणि अति पावसामुळे जमिनीचे होणारे भुस्खलन अशा मोठ्या आपत्तीमध्ये गृह विम्याचे अधिक संरक्षण मिळावे यासाठी विम्याचा हप्ता अधिक असतो. 

सर्वसमावेशक गृह विमा पॉलिसी

  • -  अनेकदा दंगल, हिंसाचार यामध्ये घराचे नुकसान होण्याची शक्यता असते.  जाळपोळ किंवा इतर घटनांमध्ये घराची मोडतोड झाल्यास त्याची विमा मिळण्यासाठी घरातील मालमत्तेचाही समावेश गृह विमा पॉलिसीमध्ये करू शकता.
  • -  या पॉलिसीत घर, घरातील  सामान, अतिरिक्त जीवनावश्यक वस्तू, वैयक्तिक मालमत्तेची हानी तसंच घरमालकाला होऊ शकणाऱ्या अपघाताचाही समावेश होतो. घराची मोडतोड, शॉर्टसर्किटमुळे लागणारी आग याचाही समावेश यामध्ये होतो. 

घराचे मूल्य

विमा काढण्यासाठी घराचे मूल्य तीन प्रकारात ठरवले जाते. घरासाठी वापरली जाणारी जागा व तिचे क्षेत्र, इमारतीचे  बांधकाम आणि घराचा परिसर. विमा फक्त बांधलेल्या इमारतीचाच असतो. घराची चालू बाजारभावनूसार किंमत १ कोटी एवढी असेल तर त्यातील ३० लाख एवढी रक्कम फक्त इमारतीची किंमत गणली जाते. त्यामुळे तुमची विमा पॉलिसी तुम्हाला फक्त ३० लाख इतके संरक्षण देते. विमाधारकाला विमा पॉलिसी ही घर बांधल्यावरच काढता येते. गृह विमा घेतलेल्या प्रत्येक विमाधारकाने विम्याची रक्कम, हफ्ता वेळेत आणि नियमितपणे भरला पाहिजे. तरच तुम्हाला गृह विम्याचे संरक्षण मिळणार आहे. अनेक विमाधारक थोडी किंवा विम्याची अर्धी रक्कम जमा करतात आणि उर्वरित रक्कम वेळेवर भरत नाहीत. तसंच पॉलिसी मध्येच बंद करतात. अशा परिस्थितीत विमाधारक उर्वरित विमा रकमेस स्वतः जबाबदार आहे, असे विमा कंपनी समजते आणि जेवढी रक्कम विम्यापोटी भरली असेल तेवढीच रक्कम विमाधारकास विमा पॉलिसीची कालमर्यादा संपल्यावर मिळते.


हेही वाचा -

नवीन वर्षात 'ह्या' पर्यायामध्ये करा गुंतवणूक

क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड का वापरावे? जाणून घ्या...


पुढील बातमी
इतर बातम्या