Advertisement

नवीन वर्षात 'ह्या' पर्यायामध्ये करा गुंतवणूक

नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी आपण अनेक पर्यायांचा विचार केला पाहिजे. एकाच पर्यायात गुंतवणूक केल्यास परतावा मिळण्याची अपेक्षा नसते.

नवीन वर्षात 'ह्या' पर्यायामध्ये करा गुंतवणूक
SHARES

आपणास नवीन वर्षात गुंतवणूक सुरू करायची असेल तर त्यासाठी आता तयारी सुरू करा. आपल्या पैशाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि पैसा भविष्यात गुंतवणुकीत आणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी आपण अनेक पर्यायांचा विचार केला पाहिजे. एकाच पर्यायात गुंतवणूक केल्यास परतावा मिळण्याची अपेक्षा नसते. आम्ही असे गुंतवणूक पर्याय सांगणार आहोत, जे २०२० मध्ये तुमच्यासाठी अनुकूल असतील.

१) डेट फंड

डेट फंड मुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा देतात. या फंडातून गरज पडेल तेव्हा आपण आपले पैसे काढू शकतो. मुदत ठेवींप्रमाणेच कर्ज फंडही गुंतवणूकीचे अनेक पर्याय देतात. १ दिवस ते १० वर्षे कालावधीचे डेट फंड आहेत. जर आपल्याला १५ दिवसांसाठी पैसे गुंतवायचे असतील तर ओवरनाइट फंड हा एक उत्तम पर्याय आहे. १५ दिवस ते १ वर्षाच्या कालावधीसाठी लिक्विड फंड आहेत. त्याचप्रमाणे १ वर्ष ते ३ वर्षासाठीचे अल्प मुदतीचे डेट फंड हा एक उत्तम पर्याय आहे. डेट म्हणजे कर्ज. डेट फंडांची गुंतवणूक कर्जरोख्यांमध्ये केली जाते. 

केंद्र सरकार, राज्य सरकार, खासगी कंपन्या, सरकारी बँका,खासगी बँका आदींचे हे कर्जरोखे असतात. डेट फंडांचे काही प्रकार आहे. गुंतवणुकदारांची वेगवेगळी आर्थिक लक्ष्य लक्षात घेऊन वेगवेगळे डेट फंड तयार केले आहेत. लिक्विड फंड, गिल्ट फंड, इन्कम फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड, शॉर्ट टर्म फंड्स, लाँग टर्म फंड, क्रेडिट ऑपर्च्युनिटी फंड, मंथली इन्कम प्लान , फिक्स्ड मॅच्योरिटी प्लान  हे डेट फंडाचे प्रकार आहेत. 

२) इक्विटी म्युच्युअल फंड

दीर्घकालावधीत महागाईचा सामना करायचा असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड हा तुमच्या पोर्टफोलिओचा एक भाग असावा. आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी गुंतवणूकीचे प्रमाण ७० टक्के असावं असं गुंतवणूक तज्ञांचं म्हणणं आहे. जे म्युच्युअल फंड (Mutual Fund ) गुंतवणुकदारांची गुंतवणूक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवतात त्या म्युच्युअल फंडांना इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Fund )म्हणतात. म्हणजे या म्युच्युअल फंडांचा पैसा शेअर बाजारात गुंतवला जातो.

 गुंतवणुकदारांचा पैसा कोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लावायचा हे त्या फंडाचा मॅनेजर ठरवतो. या मॅनेजरला मदत करण्यासाठी एक रिसर्च टीम असते. या टीमची कंपन्यांच्या कामगिरीवर बारीक नजर असते. वेळोवेळी ह्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीचा ते आढावा घेत असतात. त्यानुसार त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची की नाही हे ठरवले जाते. 

शेअर्समध्ये गुंतवणूक केली जात असल्यामुळे हे म्युच्युअल फंड जोखमीचे मानले जातात. मात्र, सर्वाधिक परतावा याच फंडांमधून मिळतो. त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक एसआयपीद्वारे दीर्घकाळासाठी केलेली जास्त फायदेशीर ठरेल. ज्या गुंतवणुकदारांना थेट शेअर बाजारात गुंतवणूक करायची नसते ते गुंतवणूकदार इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करून शेअर बाजाराच्या वाढीचा फायदा घेऊ शकतात.

३) सोने

आपल्या पोर्टफोलिओसाठी सोने हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे.  दीर्घ मुदतीत इक्विटी म्युच्युअल फंडांपेक्षा सोन्यामधील गुंतवणूक चांगला परतावा देते.  सोन्याला गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. त्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात लोकांना सोन्यात गुंतवणूक करावीशी वाटते. सोन्यामधील गुंतवणूक आजपर्यंत कधीच बुडालेली नाही. त्यामुळे नवीन वर्षातही आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्यातील गुंतवणुकीचा समावेश असावा. 

४) रिअल इस्टेट

हा भारतीयांचा सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. आपण भाडे कमावण्याच्या उद्देशाने गुंतवणूक केल्यास रिअल इस्टेट आपल्याला नियमित उत्पन्न देखील देते. आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घेण्यासाठी मालमत्ता तारण ठेवता येते. फ्लॅट खरेदी किंवा अपार्टमेंटमध्ये जमीन खरेदी करण्याशिवाय, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्येही गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. रिअल इस्टेटमधील गुंतवणूकही कधी बुडत नाही. त्यामुळे गुंतवणुकीचा उत्कृष्ट पर्याय आहे. हेही वाचा -

खूशखबर! स्टेट बँकेत भरणार ८ हजार जागा

क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड का वापरावे? जाणून घ्या...
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा