Advertisement

खूशखबर! स्टेट बँकेत भरणार ८ हजार जागा

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) क्लर्क पदाच्या तब्बल ८ हजार जागा भरल्या जाणार आहेत.

खूशखबर! स्टेट बँकेत भरणार ८ हजार जागा
SHARES

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) क्लर्क पदाच्या तब्बल ८ हजार जागा भरल्या जाणार आहेत.  भरतीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारास अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० आहे. 

बँकेतील कस्टमर सपोर्ट व सेल्स विभागासाठी कनिष्ठ साहाय्यक या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना https://www.sbi.co.in/careers या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. एका उमेदवाराला एकाच राज्यात अर्ज करता येणार आहे. या भरतीत महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातून सर्वाधिक ८६५ जागा भरल्या जाणार आहेत. मध्य प्रदेश ५१०, छत्तीसगड, ९०, दिल्ली १४३, राजस्थान ५००, बिहार २३०, झारखंडमध्ये ४५ जागा भरल्या जातील.  

अर्जदाराचं किमान वय २० पूर्ण असावं. तर, कमाल वय २८ वर्षे असावं. २ जानेवारी १९९२ च्या आधी आणि १ जानेवारी २००० नंतर जन्मलेल्यांना अर्ज करता येणार नाही. एससी, एसटी उमेदवारांसाठी वयाची अट ५ वर्ष तर, ओबीसींसाठी तीन वर्ष शिथील करण्यात आली आहे. 

प्राथमिक परीक्षा : फेब्रुवारी/मार्च २०२० 

मुख्य परीक्षा : १९ एप्रिल २०२० 



हेही वाचा -

सायरस मिस्त्रींच्या पुनर्नियुक्तीला टाटांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

एअरटेलच्या टॅरिफ दरात पुन्हा वाढ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा