Advertisement

सायरस मिस्त्रींच्या पुनर्नियुक्तीला टाटांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

टाटा सन्सच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांना पुन्हा नेमण्याच्या राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय न्यायाधीकरणाच्या (एनसीएलएटी) आदेशाविरोधात टाटा सन्सने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सायरस मिस्त्रींच्या पुनर्नियुक्तीला टाटांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान
SHARES

टाटा सन्सच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांना पुन्हा नेमण्याच्या राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय न्यायाधीकरणाच्या (एनसीएलएटी) आदेशाविरोधात टाटा सन्सने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर टाटा समूहाने तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडं आता उद्योगजगताचं लक्ष लागलं आहे. 

ख्रिसमस सुट्टीनंतर ६ जानेवारीला न्यायालय सुरु होणार आहे. ९ जानेवारीला टाटा कन्लटन्सी सर्व्हीसेस (टीसीएस) या कंपनीची बैठक होणार आहे. याआधी एनसीएलएटीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी टाटा समूहाने केली आहे. मागील महिन्यात एनसीएलएटीने सध्याचे टाटा समूहाचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांची नियुक्ती बेकायदा ठरवत सायरस मिस्त्री यांची पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती करावी असे आदेश दिले होते. चार आठवड्यात या निर्णयाची अंमलबजावणी टाटा समूहाला करायची होती. तत्पूर्वीच टाटा समूहाकडून अपेक्षेप्रमाणे एनसीएलएटीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. 


सर्वोच्च न्यायालयात टाटा समूहाच्या बाजूने निकाल लागला तर एन. चंद्रशेखरन अध्यक्षपदी कायम राहतील. सायरस मिस्त्री हे शापूरजी पालनजी अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. टाटा सन्समध्ये मिस्त्री कुटुंबीयांची १८.४ टक्के हिस्सेदारी आहे. २४ ऑक्‍टोबर २०१६ रोजी टाटा समूहातून तडकाफडकी सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यात आली होती.  मिस्त्री यांच्या जागी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. सायरस मिस्त्री यांनी न्यायालयात आणि कंपनी कायदा लवादाकडे दाद मागितली होती. सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाविरोधात तीन वर्ष कायदेशीर लढाई लढली. 



हेही वाचा -

आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, 'ही' आहे अंतिम तारीख

SBI कडून नवीन वर्षाची भेट, गृहकर्ज दरात कपात




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा