Advertisement

टाटा समूहाला झटका, सायरस मिस्त्रीच कंपनीचे अध्यक्ष!

२४ ऑक्‍टोबर २०१६ रोजी टाटा समूहातून तडकाफडकी सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मिस्त्री यांच्या जागी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

टाटा समूहाला झटका, सायरस मिस्त्रीच कंपनीचे अध्यक्ष!
SHARES

सायरस मिस्त्री आणि टाटा समूहामधील संघर्षात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने सायरस मिस्त्री यांच्या बाजूने बुधवारी महत्वाचा निर्णय दिला आहे. सायरस मिस्त्री हेच टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत असा निर्णय लवादाने दिला आहे. लवादाच्या या निर्णयामुळे टाटा समूहाला मोठा धक्का बसला आहे. 

नटराजन चंद्रशेखरन टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून नटराजन चंद्रशेखरन यांची केलेली निवड बेकायदा असल्याचा निर्णय राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने दिला आहे.  सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाविरोधात तीन वर्ष कायदेशीर लढाई लढली. २४ ऑक्‍टोबर २०१६ रोजी टाटा समूहातून तडकाफडकी सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यात आली होती.  मिस्त्री यांच्या जागी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. सायरस मिस्त्री यांनी न्यायालयात आणि कंपनी कायदा लवादाकडे दाद मागितली होती. या संघर्षात कधी मिस्त्री तर कधी टाटा समूहाची सरशी झाली, मात्र गेल्या वर्षभरापासून हे प्रकरण कंपनी कायदा लवादाकडे प्रलंबित होते. 

 सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्याचा निर्णय अत्यंत अनपेक्षित असा होता. टाटा सन्सच्या संचालक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. सर दोराबजी टाटा आणि सर रतन टाटा या दोन विश्वस्त मंडळांकडे टाटा सन्सच्या अध्यक्षाच्या निवडीचा आणि त्याला हटविण्याचा अधिकार आहे. त्यासाठी दोन्ही विश्वस्त मंडळांची स्वतंत्र तीन सदस्यीय समिती आहे. टाटा सन्समध्ये या दोन्ही ट्रस्टची मिळून ६६ टक्के इतकी मालकी आहे. तर, मिस्त्री यांच्या शापुरजी पालनजी कुटंबियांचा टाटा सन्समध्ये सर्वाधिक १८.४ टक्के इतका वाटा आहे. शापुरजी पालनजी समुहाने सायरस मिस्त्रींना अध्यक्षपदावरून दूर करणे, अवैध असल्याचे म्हटले होते. सायरस हे पालनजी मिस्त्री यांचे पूत्र असून ते समुहाचे प्रमुख आहेत.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा