Advertisement

आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, 'ही' आहे अंतिम तारीख

आधार आणि पॅनकार्ड अद्याप लिंक न करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी मुदत वाढवली आहे.

आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, 'ही' आहे अंतिम तारीख
SHARES
आधार आणि पॅनकार्ड अद्याप लिंक न करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवली आहे. याआधी लिंक करण्यासाठी  ३१ डिसेंबर २०१९ ही शेवटची तारीख होती. 

सीबीडीटीने पॅन आधार लिंकसाठी आठव्यांदा मुदतवाढ दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आधारकार्ड घटनात्मक वैध असल्याचा निकाल दिला होता. त्याचवेळी पॅनकार्डचे वितरण आणि आयटी रिटर्नसाठी आधारकार्ड बंधनकारक केले होते. त्या आदेशाला अनुसरून सीबीडीटीने नागरिकांना पॅन आणि आधारकार्ड परस्परांना लिंक करण्याच्या सूचना केल्या आहेत.

आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर अनेक सरकारी, बँकिंग, इन्कम टॅक्स भरण्याची कामे करण्यात अडथळे येतात. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आधार-पॅन लिंक करणं अनिवार्य आहे. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना आयटीआर भरताना आपला आधार क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक सांगणं अनिवार्य आहे. 

असं करा लिंक

इन्कम टॅक्स विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाईवरुन आधार-पॅन लिंक करता येईल.  तसंच एसएमएसच्या माध्यमातूनही  आधार-पॅन लिंक करता येणार आहे.  एसएमएसच्या माध्यमातून आधार-पॅन लिंक करण्यासाठी ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर UIDPAN लिहून स्पेस देत १२ अंकी आधार नंबर नंतर स्पेस देत १० अंकी पॅन नंबर लिहून एसएमएस सेंड करावा लागेल.



हेही वाचा -

SBI कडून नवीन वर्षाची भेट, गृहकर्ज दरात कपात

क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड का वापरावे? जाणून घ्या...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा