Advertisement

SBI कडून नवीन वर्षाची भेट, गृहकर्ज दरात कपात

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना मोठी भेट दिली आहे.

SBI कडून नवीन वर्षाची भेट, गृहकर्ज दरात कपात
SHARES

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. गृहकर्जाच्या एक्स्टर्नल बेंचमार्क दरात सोमवारी ०.२५ टक्क्यांची कपात करण्याची घोषणा बँकेने केली. या कपातीनंतर एसबीआयच्या गृह कर्जाचा व्याजदर ७.८० टक्के झाला आहे. सध्या व्याजदर ८.०५ टक्के आहे. व्याजदर कपातीनंतर गृहकर्जाचा ईएमआय घटणार आहे. 

नवीन दर १ जानेवारी २०२० पासून लागू होतील. एसबीआय दर तिमाहीत व्याजदारांचा आढावा घेते. व्याजदर कपातीनंतर जुन्या ग्राहकांच्या कर्जाचा व्याजदर ७.८० टक्के झाला आहे. तर नवीन कर्जदारांना ७.९० टक्क्याने कर्ज मिळेल. नवीन ग्राहकांसाठी सध्याचा कर्जाचा व्याजदर ८.१५ टक्के आहे. चालू वर्षात सलग आठव्यांदा एसबीआयने एमसीएलआर दर घटवला आहे. यावर्षी आतापर्यंत व्याजदरात १.३५ टक्के कपात केली आहे.

ऑक्‍टोबरपासून एसबीआयने बाह्य मानकावर (एक्‍स्टर्नल बेंचमार्क) आधारित कर्जदर निश्‍चितीचे धोरण लागू केले आहे. यासाठी रिझर्व्ह बॅंकेचा रेपो दर एक्‍स्टर्नल बेंचमार्क म्हणून ग्राह्य धरण्यात आला आहे. सध्या रेपो दर ५.१५ टक्के आहे. डिसेंबरमध्ये आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल झाला नाही. असे असतानाही एसबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत गृह कर्जावरील व्याज दरात कपात केली आहे. रेपो दरात कोणताही बदल झालेला नसतानाही एसबीआय व्याज दर कपात करणारी पहिली बँक ठरली आहे.



हेही वाचा -

SBI चं 'हे' एटीएम १ जानेवारीपासून होणार बंद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा