Advertisement

SBI चं 'हे' एटीएम १ जानेवारीपासून होणार बंद

एसबीआयने एक ट्वीट करत डेबिट कार्ड बदलून घेण्याचं आवाहन आपल्या खातेधारकांना केलं आहे.

SBI चं 'हे' एटीएम १ जानेवारीपासून होणार बंद
SHARES

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चं मॅग्नेटिक स्ट्रिप असणारं डेबिट कार्ड ३१ डिसेंबरनंतर बंद होणार आहे. जर एसबीआयच्या ग्राहकांनी मॅग्नेटिक स्ट्रिप असणारं डेबिट कार्ड बदलून नाही घेतलं तर या कार्डचा काहीही उपयोग होणार नाही. एसबीआयने एक ट्वीट करत हे कार्ड बदलून घेण्याचं आवाहन आपल्या खातेधारकांना केलं आहे. 

एसबीआयने मॅग्नेटिक स्ट्रिप असणारे सर्व कार्ड हे ईएमव्ही चिप आणि पिन आधारित कार्डने बदलेले आहेत. एसबीआयने ट्टीटमध्ये म्हटलं की,  ३१ डिसेंबर २०१९ नंतर सर्व मॅग्नेटिक स्ट्रिपचे कार्ड  डिअॅक्टिव्हेट करण्यात येतील.काही जणांचे कार्ड बदलणं शिल्लक असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपले कार्ड अपडेट करुन घ्यावेत. मॅग्नेटिक स्ट्रिपचे डेबिट कार्डला जास्त सुरक्षित ईएमव्ही चिप आणि पिन आधारित एसबीआय डेबिट कार्डमध्ये बदलण्यासाठी तात्काळ अर्ज करा.

आपल्या जवळच्या ब्रँचमध्ये ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत हे कार्ड बदलून घेण्यासाठी अर्ज करु शकतात, असं एसबीआयने म्हटलं आहे. एसबीआयने त्या ग्राहकांना देखील आपल्या होम ब्रँचशी संपर्क साधण्यास सांगितला आहे की, ज्यांनी ईएमव्ही चिप आधारित कार्डासाठी अर्ज केला आहे पण आतापर्यंत त्यांना नवं कार्ड मिळालेलं नाही. एसबीआय ग्राहक ईमव्ही डेबिट कार्डसाठी नेटबँकिंगने अर्ज करु शकतात. यासाठी त्यांना www.onlinesbi.com वर जाऊन आयडी पासवर्डने लॉग इन करावं लागेल. ई-सर्विस या पर्यायावर जाऊन  एटीएम कार्ड सर्विस हा पर्याय निवडायचा आहे. इथं ग्राहकांना आपल्या नव्या एटीएम आणि डेबिट कार्डासाठी अर्ज करता येईल. 



हेही वाचा -

वर्षात मुकेश अंबानींच्या संपत्तीत 'इतकी' मोठी वाढ

चीनच्या नावावर असलेला विश्वविक्रम भारतानं मोडला




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा