Advertisement

वर्षात मुकेश अंबानींच्या संपत्तीत 'इतकी' मोठी वाढ

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे फक्त भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. सरते वर्ष २०१९ मध्ये अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचं दिसून येतं.

वर्षात मुकेश अंबानींच्या संपत्तीत 'इतकी' मोठी वाढ
SHARES

 रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे फक्त भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. सरते वर्ष २०१९ मध्ये अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचं दिसून येतं. मुकेश अंबानी यांची संपत्ती या वर्षी १.१७ लाख कोटी रुपयांनी (१६.५ अब्ज डॉलर) वाढली आहे. या वाढीसह त्यांची एकूण संपत्ती आता ४.३१ लाख कोटी रुपये (६०.८ अब्ज डाॅलर) झाली  आहे. 

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, जगातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी १२ व्या क्रमांकावर आहेत.  टेलिकॉमपासून, पेट्रोल ते रिटेलपर्यंत त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे. त्यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर्स मागील एका वर्षात तब्बल ४१ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. रिलायन्सचे ४७ टक्के शेअर्स अंबानी यांच्याकडे आहेत. 

 चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्या संपत्तीत देखील ११.३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या संपत्तीत १३.२ अब्ज डॉलरची घट झाली आहे. रिलायन्सने गेल्या काही वर्षांत शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्सच्या मुख्य व्यवसायाशिवाय किरकोळ व दूरसंचार क्षेत्रात लक्षणीय विस्तार केला आहे. दूरसंचार व्यवसायात अंबानी यांनी ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ३ वर्षात जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली. रिलायन्स ई-कॉमर्समध्ये प्रवेश करण्याचीही तयारी करत आहे.



हेही वाचा -

चीनच्या नावावर असलेला विश्वविक्रम भारतानं मोडला

टॅरीफ दरात दरवाढ होण्याची शक्यता




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा