Advertisement

चीनच्या नावावर असलेला विश्वविक्रम भारतानं मोडला

नवी मुंबई येथील लिट्ल मॉलमध्ये विराग मधुमालती आणि त्याच्या टीमनं रविवारी सलग गायनाचा नवीन विश्वविक्रम नोंदवला.

चीनच्या नावावर असलेला विश्वविक्रम भारतानं मोडला
SHARES

भारतानं सलग गायनाचा चीनच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडीत काढला. खारघर नवी मुंबई येथील लिट्ल मॉलमध्ये विराग मधुमालती आणि त्याच्या टीमनं रविवारी सलग गायनाचा नवीन विश्वविक्रम नोंदवला. चीनच्या नावावर सलग ७९२ तास २ मिनिटांच्या गायनाचा विश्वविक्रम होता. विराग मधुमालती यांच्या टीमनं सलग ८९५ तास ४ मिनिटं गाऊन नव्या विश्वविक्रमाची नोंद केली.

"भारताच्या नावानं एक विश्वविक्रम अर्पण करताना मला जो आनंद होत आहे तो मी शब्दात मांडू शकणं कठिण आहेभारतात जन्म घेतला याचा मला खूप अभिमान आहेआजचा दिवस सुवर्णमय आहे. यामागे माझ्या सगळ्या टीमचं ही श्रेयं आहेया पुढेही भारताचं नाव रोशन करण्याचा मानस राहील,”

विराग मधुमालती, कलाकार

विराग मधुमालती यांचा हा पहिला विश्वविक्रम नाहीतर हा त्यांच्या नावे चौथावा जागतिक विश्वविक्रम आहे. हे विक्रम राष्ट्रीय एकात्मता आणि नेत्रदान जनजागृतीसाठी समर्पित करण्यात आले आहेत


या कार्यक्रमास गिनीज वर्ल्डचे प्रतिनिधी ऋषी नाथकल्पना चावला यांचे वडील बन्सीलाल चावलानिवृत्त प्रिंसिपल सायन्टिस प्रेम प्रकाश अतरेजा आदी मान्यवर उपस्थित होते

"मला अत्यंत आनंद होत आहे कि भारतानं हा रेकॉर्ड तोडला आणि ८९५ तास ४ मिनिटांचा नवीन विश्वविक्रम केला आहेविराग मधुमालती याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत,” असं गिनीज वर्ल्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ म्हणाले.

  विराग मधुमालती आणि त्यांच्या टीमनं हा कार्यक्रम १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत आयोजित केला होता. यात राष्ट्रीय एकात्मता, अवयवदान, बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कँपस विथ हेलमेट, सेव्ह वॉटर - सेव्ह ट्रीज, रक्त दान या ज्वलंत सामाजिक उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार केला गेला. यात महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, चेन्नई, आंध्र प्रदेश, ओरिसा, राजस्थान आणि इतर राज्यातून 800 हून अधिक गायकांनी भाग घेतला होता.

निवृत्त प्रिंसिपल सायन्टिस प्रेम प्रकाश अतरेजा म्हणाले की, "मला खूप आनंद होत आहेजो कोणी स्वप्न बघतो आणि ती स्वप्न जर देशाच्या प्रगतीत हातभार लावणारी असतील तर त्यासाठी आमची पिढीआजची पिढी तसंच येणारी पिढी ही साथ देईल.  देश घडवणं आणि देशाचं नाव उज्वल करणं हे आपल्या हातात असतं. त्यादृष्टीनं आपल्याला पावले उचलणं गरजेचं आहे.”   

कार्यक्रमात ४ कॅमेरे तसेच प्रत्येक सेकंदाची नोंद करण्यासाठी निरीक्षक ठेवण्यात आले होते. विविध रूप नामांकित मंडळी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी भेट देऊन सर्वांना प्रोसाहित करत होती. हा अखंड संगीत यज्ञ गेले ३८ दिवस कलारसिकांसाठी एक संगीत मेजवानी ठरलीहेही वाचा

ढोल ताशाला चढली 'गेम ऑफ थ्रोन्स'ची झिंग

१२५ फूट साडीवर साकारला जिजाऊंचा जीवनप्रवास

संबंधित विषय
Advertisement