Advertisement

१२५ फूट साडीवर साकारला जिजाऊंचा जीवनप्रवास

शिवबा' ते 'छत्रपती शिवाजी महाराज' असा यशस्वी प्रवास घडवून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास साकारणाऱ्या राजमाता जिजाऊं यांचं जीवनचरित्र एका अनोख्या पद्धतीनं साकारण्यात आलं आहे.

१२५ फूट साडीवर साकारला जिजाऊंचा जीवनप्रवास
SHARES

आतापर्यंत राजमाता जिजाऊ यांचं जीवनचरित्र पुस्तकातून, चित्रपटांमधून आणि मालिकांमधून साकारण्यात आलं आहे. पण पहिल्यांदाच जिजाऊ यांचं जीवनचरित्र एका अनोख्या पद्धतीनं साकारण्यात आलं आहे. श्रृतिका घाग या टेक्सटाईल डिझायनरच्या विद्यार्थीनीनं जिजाऊंच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग साडीवर चित्रित केले आहेत. जिजाऊंच्या जन्मापासून ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत सर्व प्रसंग या साडीवर साकारण्यात आले आहेत.


३६ प्रसंग

जिजाऊंचा जन्म, त्यांचं तलवार बाजीचं प्रशिक्षण याशिवाय शिवरायांची मातृभक्ती, जिजाऊंच्या प्रती आदर असे अनेक प्रसंग या साडीवर पाहायला मिळत आहेत. तब्बल १२ मजली इमारतीएवढ्या म्हणजेच १२५ फूट लांब साडीवर ३६ प्रसंग साकारण्यात आले आहेत. साडीचा काठही जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाला आणि कर्तृत्वाला शोभणारा आहे. काठावर गडांची नावं, शिवरायांच्या राजमुद्रा, गनिमी कावा, किल्ले अशा अनेक शब्दांचं सुलेखन करण्यात आलं आहे.


११४ तासात तयार

श्रृतिकानं ही कलाकृती ११४ तासात काळ्या, सोनेरी, लाल रंगछटाचा वापर करून तयार केली आहे. जिजाऊंचा जीवनप्रवास चित्रांच्या माध्यमातून कसा मांडायचा यासाठी श्रृतिकानं दीड वर्ष अभ्यास केला. त्यानंतरच तिनं ही साडी साकारली.  या साडीची लिम्का बुक, गिनिज बुक अशा रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी श्रृतिकाची इच्छा आहे



हेही वाचा -

इंजिनीअर ते पॅशनेट पेंटर

Exclusive : चेहरा जळाला पण स्वप्न नाही; शरीरावर व्रण असलेली पहिली मॉडेल





संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा