Advertisement

इंजिनीअर ते पॅशनेट पेंटर

अभिजीत रोज रात्री एक चित्र काढायचा आणि फेसबुकवर शेअर करायचा. अभिजीतनं अातापर्यंत विराट कोहली, राज ठाकरे, युवराज सिंग, हार्दीक पंड्या, अशोक सराफ, सई ताम्हणकर अादी दिग्गजांची चित्रे काढली अाहेत. या चित्रांवर त्याने त्यांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या आहेत.

इंजिनीअर ते पॅशनेट पेंटर
SHARES

चित्राच्या माध्यमातून काही चित्रकार समाजाला वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक कलाकार म्हणजे अभिजीत मुरुडकर. अभिजीत त्याच्या चित्रांच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे संदेश देत असतो. अापल्या चित्रांनी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडू अाणि अभिनेत्यांची मनं जिंकली आहेत.




क्विक स्केच बिफोर स्लिपींग

अभिजीत व्यवसायानं इंजिनीअर आहे. २०१२ साली त्यानं पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनीअरींग महाविद्यालयातून आय. टी. इंजिनीअरींगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्याने हार्डवेअर टेक्नोलॉजी या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कामाला सुरुवात केली. पण लहानपणापासूनच चित्रकलेची प्रचंड आवड असल्यामुळं कामातून वेळ काढून रोज रात्री एक चित्र काढण्याचं त्याने ठरवलं.  

यासाठी त्याने 'क्विक स्केच बिफोर स्लिपींग' हा उपक्रम सुरू केला होता. यानुसार अभिजीत रोज रात्री एक चित्र काढायचा आणि फेसबुकवर शेअर करायचा. अभिजीतनं अातापर्यंत विराट कोहली, राज ठाकरे, युवराज सिंग, हार्दीक पंड्या, अशोक सराफ, सई ताम्हणकर अादी दिग्गजांची चित्रे काढली अाहेत. या चित्रांवर त्याने त्यांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या आहेत. 



नाटकासाठी व्यंगचित्रे 

फेसबुकवर शेअर केलेलं त्याचं चित्र पाहून लेखक, दिग्दर्शक प्रल्हाद कुडतरकर यांनी त्यांच्या 'वीर दौडले सात' या व्यावसायिक नाटकाच्या प्रमोशनसाठी व्यंगचित्रे काढण्यास सांगितली होती. ही  व्यंगचित्रे करिअरला मिळालेली कलाटणी होती, असं अभिजीत सांगतो. 



मी छोटा शिशूमध्ये असताना फळ्याखाली पडलेल्या खडूनं जमिनीवर सुर्य आणि शिडीचं चित्र काढलं होतं. त्यानंतर मी सतत मी चित्र काढायला लागलो. चित्रकलेच्या अावडीमुळे माझी आई मला चित्रकला स्पर्धेत सहभाग होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायची. त्यावेळी मी स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांचे चित्र पाहून शिकत राहिलो.
- अभिजीत मुरुडकर



हेही वाचा -

Exclusive: ‘बाजीराव मस्तानी’चे गीतकार होणार दिग्दर्शक!

‘होम स्वीट होम’मध्ये पुन्हा भेटणार रिमा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा