Advertisement

‘होम स्वीट होम’मध्ये पुन्हा भेटणार रिमा

अभिनेत्री रीमा लागू यांनी गेल्या वर्षी अचानक या जगाच्या रंगमंचावरून चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी एक्झीट घेतली. पण आता याच रीमा ‘होम स्वीट होम’ या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा रुपेरी पडद्यावर भेटणार आहेत.

‘होम स्वीट होम’मध्ये पुन्हा भेटणार रिमा
SHARES

बहारदार अभिनयाने अनेक व्यक्तिरेखा सजीव करणाऱ्या अभिनेत्री रीमा लागू यांनी गेल्या वर्षी अचानक या जगाच्या रंगमंचावरून चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी एक्झीट घेतली. पण आता याच रीमा ‘होम स्वीट होम’ या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा रुपेरी पडद्यावर भेटणार आहेत.


दर्जेदार अभिनय

दर्जेदार अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत लौकिक प्राप्त करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा. सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. मराठी-हिंदी नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटवला.

दिग्दर्शक कोण? 

त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्या आपल्या मधून निघून गेल्या तरी त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. रिमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून, या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिनेते हृषीकेश जोशी यांनी केलं आहे.


'यांच्या' प्रमुख भूमिका

घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं, याच घराविषयी आणि घरातील नात्यांविषयी भाष्य करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. यांची आहे. हृषीकेश दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या ‘होम स्वीट होम’ या चित्रपटात रिमा यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’मध्ये आहेत.

आईकडून मिळाला अभिनयाचा वारसा

रिमा यांना त्यांच्या आईकडून अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांनी ५० पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी प्रथम मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटांमधून काम करण्यास सुरुवात केली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू झाला. हिंदी चित्रपटात रिमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका सर्वात जास्त केल्या आहेत. पण त्यांच्या सर्वच भूमिका जबरदस्त गाजल्या आहेत.

‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे, ‘होम स्वीट होम’ हा सिनेमा नात्यांच्या रिडेव्हलपमेंटवर भाष्य करणारा आहे.


हेही वाचा - 

‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाने जुळवली रिअल लाईफ जोडी

सचिन पिळगावकरांच्या हस्ते ‘पाटील’ चित्रपटाचं पोस्टर अनावरण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा