Advertisement

सचिन पिळगावकरांच्या हस्ते ‘पाटील’ चित्रपटाचं पोस्टर अनावरण

स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि, सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे.

सचिन पिळगावकरांच्या हस्ते ‘पाटील’ चित्रपटाचं पोस्टर अनावरण
SHARES

मराठी सिनेमाच्या पडद्यावर बऱ्याचदा आगळ्या वेगळ्या गोष्टींचंही प्रतिबिंब उमटत असतं. यात स्वत:च्या जिद्दीनं स्थान, यश मिळवणारे अनेकजण असतात. त्यांची धडाडी इतरांना प्रेरणादायी ठरते. अशाच एका जिद्दीची गोष्ट सांगणाऱ्या ‘पाटील’ या मराठी चित्रपटाचं पोस्टर अनावरण सचिन पिळगावकर यांनी केलं.



२६ ऑक्टोबरला प्रदर्शित

२६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘पाटील’ या चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांनी केलं आहे. त्यांच्या पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नाचं कौतुक करतानाच पिळगांवकरांसह इतर मान्यवरांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. मान्यवरांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आपली मूल्य जपण्याचा प्रयत्न करत जगण्याचा एक वेगळा संघर्ष मांडणारा ‘पाटील’ हा चित्रपट प्रत्येकाला खूप काही शिकवणारा असेल, असा विश्वास दिग्दर्शकांनी याप्रसंगी व्यक्त केला.


प्रेरणादायी प्रवास 

स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि, सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ.जगदीश पाटील (कोकण आयुक्त) दिसणार आहेत.


मान्यवर उपस्थित 

निर्माता-दिग्दर्शक अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्यासह श्रीकांत भारतीय, ओमप्रकाश शेट्ये (मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी) ‘परिंदा’, ‘वास्तव’ या हिंदी चित्रपटांचे लेखक इम्तियाज हुसेन, आमदार हेमंत पाटील, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील आदी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच चित्रपटातील कलाकारही या सोहळ्याला उपस्थित होते.
 

कथा, पटकथा मिजगर यांची

या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच कथा आणि पटकथा मिजगर यांनी लिहिली आहे. नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, संतुकराव हंबर्डे, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी कांबळे, सौरभ तांडेल, सुधीर पाटील, सोमनाथ दिंगबर, रामराव वडकुते, संतोष बांगर, जेनील शहा, विजय जैन, हाजी पटेल, गणेश बीडकर, सहनिर्माते आहेत. अमेय खोपकर, ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडीओज’ यांचे सहकार्यसुद्धा चित्रपटाला लाभलं आहे.



हेही वाचा - 

‘ट्रकभर स्वप्न’ सिनेमाद्वारे मुकेश ऋषी मराठीत

नितीन देसाईंच्या एन.डी.स्टुडियोत सिनेमाची कार्यशाळा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा