Advertisement

ढोल ताशाला चढली 'गेम ऑफ थ्रोन्स'ची झिंग

गेम ऑफ थ्रोन्सचं टायटल म्युझिक चक्क ढोल-ताशावर. पण नेमकं गेम ऑफ थ्रोन्सचं टायटल म्युझिक ढोल-ताशावर उतरवण्यामागे किती मेहनत हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

ढोल ताशाला चढली 'गेम ऑफ थ्रोन्स'ची झिंग
SHARES

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा 'गेम ऑफ थ्रोन्स'चा आठवा सिझन आज प्रदर्शित झाला. मागील अनेक दिवसांपासून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅपवर गेम ऑफ थ्रोन्स म्हणजेच GOT ची चांगलीच चर्चा होती. गेम ऑफ थ्रोन्सच्या पहिल्या सीजनपासून अनेकांची उत्सुक्ता शिगेला पोहचली होती. अखेर आज या मालिकेचा आठवा सिजन प्रदर्शित झाला.

पहिल्या सिजनपासूनच गेम ऑफ थ्रोन्सची भारतात चांगलीच क्रेझ आहे. खास करून ही मालिका तरूणांच्या जास्त पसंतीस उतरली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डोंबिवलीतील गुडीपाडव्याची शोभायात्रा... आता तुम्ही बोलाल गेम ऑफ थ्रोन्स आणि डोबिंवलीतील शोभायात्रेचा काय संबंध?  गेम ऑफ थ्रोन्स कुठे? आणि डोंबिवलीची शोभा यात्रा कुठे? दोघांचा लांब लांबपर्यंत काही संबंध नाही. माझ्यासारखा तुमचा देखील असाच काहीसा समज झाला असेल. पण थांबा... खाली दिलेला व्हिडिओ बघा आणि मग बोला...


ढोल-ताशावर गेम ऑफ थ्रोन्स

पाहिलात का? जे काही पाहिलं त्यावर तुमचा विश्वास बसत नसेल. काय बोलावं हे देखील सुचत नसेल? 'गेम ऑफ थ्रोन्स'चं टायटल म्युझिक चक्क ढोल-ताशावर. असा काही प्रयोग केला जाऊ शकतो याचा विचार देखील कधी कुणी केला नसेल. पण ही किमया करून दाखवली आहे डोंबिवलीतल्या आरंभ ढोल-ताशा पथकानं...  इतर सणांच्या वेळी या पथकाच्या तालावर अनेक उत्साही थिरकतात. पण गुढी पाडव्याला मात्र या पथकानं कमालच केली. शोभायात्रेच्या निमित्तानं आरंभ पथकानं GOT चा टायटल ट्रॅक वाजवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.


अशी सुचली संकल्पना

गेम ऑफ थ्रोन्सचं टायटल म्युझिक ढोल-ताशावर उतरवण्यामागे किती मेहनत हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेलहेच जाणून घ्यायला आम्ही आरंभ ढोल-ताशा पथकाचे निशांत चव्हाण यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले,  डोंबिवलीत गुढी पाडवा उत्साहात साजरा केला जातो. आरंभ प्रतिष्ठान गुढी पाडवा, दिवाळी, गणेशोत्सव या सणांना काही ना काही सादर करते. प्रत्येक वेळी काही तरी वेगळं करण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षी आम्ही विचार केली की, पारंपरिक वाद्यासोबत काही आंतराराष्ट्रीय म्युझिकचं फ्युजन करता येऊ शकतं का? गेम ऑफ थ्रोन्स काही महिन्यांमध्ये प्रदर्शित होणार होता. याशिवाय भारतात गेम ऑफ थ्रोन्सची चांगलीच क्रेझ आहे. सो आम्ही गेम ऑफ थ्रोन्सचं थीम साँग पारंपरिक वाद्यासोबत फ्युजन करण्याचं ठरवलं.


पारंपरिक वाद्यासोबत फ्युजन करणं सोपं नसतं. गेम ऑफ थ्रोन्सचं टायटल म्युझिक ढोल-ताशावर उतरवणं कठीण होतं. कारण आम्हाला लाइव्ह सादर करायचं होतं. एक जरी चुक झाली तरी गाण्याचा पुढचा ताल पूर्ण बिघडतो. जेवढे वादक तिकडे उपस्थित होते त्यांच्यासोबत ताळमेळ असणं फार गरजेचं असतं. यासाठी आम्ही एक ते दीड महिना सराव केला. ८० वादकांनी मिळून गेम ऑफ थ्रोन्सचं म्युझिक ढोल-ताशावर सादर केलं. यात ४० ढोल, १८ ताशे आणि १५ ध्वजधारी होते. बुलबुल (बँजो) आणि ढोल ताशा वापरण्यात आले आहेत. पूर्णपणे मराठमोळ्या अंदाजात आम्ही सलामी दिली. 

- निशांत चव्हाण, आरंभ ढोल-ताशा पथक


व्हिडिओ ट्रेंड

हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर  ट्रेंड होतोय. याबद्दल चव्हाण म्हणाले की, आम्हाला पण वाटलं नव्हतं की, हे साँग एवढं ट्रेंड होईल. पण आता लोकांकडून मिळालेली पसंती पाहता आमच्या मेहनतीला यश आलं असचं म्हणता येईल


२०१२ साली स्थापना

२०१२ साली आरंभ पथकाची स्थापना झाली. २० वादकांपासून सुरू झालेला प्रवास आज २०० वादकांपर्यंत पोहोचला आहे. वादनाबरोबर अनेक सामाजिक कार्यात आरंभ पथकानं सहभात घेतला आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा