Advertisement

एअरटेलच्या टॅरिफ दरात पुन्हा वाढ

डिसेंबरमध्ये टॅरिफ प्लॅनच्या दरात बदल केल्यानंतर आता पुन्हा दर वाढवले आहेत.

एअरटेलच्या टॅरिफ दरात पुन्हा वाढ
SHARES

नव्या वर्षाच एअरटेल कंपनीनं त्यांच्या ग्राहकांना झटका दिला आहे. डिसेंबरमध्ये टॅरिफ प्लॅनच्या दरात बदल केल्यानंतर आता पुन्हा दर वाढवले आहेत. त्यामुळे एअरटेल ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.

१ जानेवारीपासून प्लॅनचे नवे दर लागू होणार आहेत. एवढेच नाही तर तुम्हाला एअरटेल कंपनीसोबत तुमचे मोबाईल कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना ४५ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. तर या प्लॅनची वॅलिडिटी २८ दिवसांची असणार आहे. यापूर्वी हा प्लॅन ३५ रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला होता.

हे आहेत नवे दर

एअरटेल ग्राहकांना कॉलिंगसाठी प्रति मिनिटांसाठी १ रुपया ४० पैसे मोजावे लागणार आहेत. तर SMS च्या दरात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. एसएमएससाठी ग्राहकाला आता १ रुपयांऐवजी १ रुपया ५ पैसे द्यावे लागणार आहेत. तर डिसेंबर महिन्यात कंपनीनं त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ केली होती.

परवडतील असे प्लॅन

एकीकडे जरी टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केली असेल. पण दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला परवडतील असे काही प्लॅन्सही आणले आहेत. एअरटेल कंपनीचा ३९८ रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. २८ दिवसांची वॅलिडिटी असणाऱ्या या प्लॅनमध्ये दररोज ३GB डेटा ऑफर केला जात आहे. यात अजून अनलिमिटेड लोकल, एसडी आणि रोमिंग कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस पाठवता येणार आहेत.



आता फ्री इंटरनेटच्या मदतीनं करा कॉल, 'या' कंपनीची नवी सेवा

आता 'इतक्या' दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट, 'ट्राय'चा नवा नियम


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा