Advertisement

आता फ्री इंटरनेटच्या मदतीनं करा कॉल, 'या' कंपनीची नवी सेवा

वाय-फाय कॉलिंगला वॉइस ओव्हर वाय-फाय देखील म्हटले जाते. वाय-फायद्वारे तुम्ही वाय-फाय, पब्लिक वाय-फाय आणि वाय-फाय हॉटस्पॉटच्या मदतीनं कॉलिंग करू शकता.

आता फ्री इंटरनेटच्या मदतीनं करा कॉल, 'या' कंपनीची नवी सेवा
SHARES

नवीन टेरिफ प्लॅन लागू केल्यानंतर आता एअरटेलनं वाय-फाय सर्विस लाँच केली आहे. एअरटेलनं या नवीन सेवेला एअरटेल वाय-फाय कॉलिंग नाव दिलं आहे. या सेवेद्वारे युजर्स फ्रीमध्ये इंटरनेटच्या मदतीनं फोनवर बोलू शकतात.

काय आहे वाय-फाय कॉलिंग ?

वाय-फाय कॉलिंगला वॉइस ओव्हर वाय-फाय देखील म्हटले जाते. वाय-फायद्वारे तुम्ही वाय-फाय, पब्लिक वाय-फाय आणि वाय-फाय हॉटस्पॉटच्या मदतीनं कॉलिंग करू शकता. उदाहरणार्थ वाय-फाय अथवा हॉटस्पॉट घेऊन फोनवर आरामशीर बोलू शकता. वाय-फायचा सर्वात मोठा फायदा रोमिंगचा आहे. कारण तुम्ही कोणत्याही वाय-फायद्वारे मोफत बोलू शकता.

सध्या कुठे उपलब्ध

सध्या दिल्ली-एनसीआर भागातच ही सेवा उपलब्ध आहे.

तुमच्या फोनमध्ये वाय-फाय कॉलिंग सपोर्ट असेल तरच तुम्ही सेवा वापरू शकता. फोनच्या सेटिंग्समध्ये नेटवर्क सेटिंग्समध्ये तुम्ही तपासू शकता. सॅमसंग फोनबद्दल सांगायचे तर गॅलेक्सी जे6, सॅमसंग ऑन 6, सॅमसंग गॅलेक्सी एम30एम आणि गॅलेक्सी ए10एस यामध्ये वाय-फाय कॉलिंग सपोर्ट मिळत आहे. शाओमीच्या पोको एफ1, रेडमी के 20 आणि रेडमी के20 प्रो या फोनमध्ये तसेच, वनप्लसच्या वनप्लस 7, वनप्लस 7 प्रो, वनप्लस 7टी प्रो स्मार्टफोनमध्ये ही सेवा मिळत आहेहेही वाचा

MNP प्रक्रिया ५ दिवस बंद, 'हे' आहे कारण

आता 'इतक्या' दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट, 'ट्राय'चा नवा नियम


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा